monsoon in andaman sakal
देश

Weather Update: मान्सून केरळमध्ये उद्या दाखल होणार तर राज्यात...

मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट

धनश्री ओतारी

मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 5 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये, तर 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. (Weather Update June 5 Monsoon in Kerala after June 10 in Maharashtra)

दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, तसेच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत पोहोचलेला मान्सून तिथेच थांबलेला आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे दोन दिवस तरी आहे तीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात अनुकूल स्थिती येत्या काही दिवसांत तयार झाली, तरच मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत मान्सून दक्षिण अरबी सागराच्या काही भागांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, तसेच अंदमान निकोबार बेटाचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बराचसा भाग व्यापला आहे.

मात्र, सध्या 5 जूनला अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात चक्रीवादळ तयार होणार आहे. तसेच येत्या 48 तासांत याच भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.

8 आणि 9 जूनला उत्तर अंदमान बेटांपासून ते म्यानमारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. हे क्षेत्र म्यानमारच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. या सर्व स्थितीमुळे मान्सूनचा प्रवास थांबला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT