Monsoon Season esakal
देश

मान्सूनचा परतीचा प्रवास ६ ऑक्टोंबरपासून - IMD

सकाळ डिजिटल टीम

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या अवशेषांचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे.

नवी दिल्ली - देशातील मान्सूनचा परतीचा प्रवास यावेळी तब्बल २० दिवस उशिरा सुरू होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. गुरुवारी हवामान विभागाने म्हटलं की, ६ ऑक्टोबरपासून वायव्य भारताच्या काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यपणे १७ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. गेल्या वर्षी हाच प्रवास २८ सप्टेंबरला सुरु झाला होता.

हवामान विभागाने म्हटलं की, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा सर्वाधिक परिणाम वायव्य भारतात होणार आहे. यामुळे अनेक भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून भारताच्या वायव्य भागातून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या अवशेषांचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. ते कच्छच्या आखाताकडे सरकले आहे. हे क्षेत्र आणखी तीव्र होत त्यापासून अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नाही. गेल्या २४ तासांत गुजरातेतील सौराष्ट्र भागात मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत गुजरातच्या किनारी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

बुधवारी दक्षिण गुजरात व खंबातच्या आखातावर असलेला कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकला. गुरुवारी त्याची तीव्रता वाढून कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले. सध्या हे क्षेत्र द्वारकाच्या ईशान्येला ५० कि.मी. वर तर पाकिस्तानातील कराचीपासून ३४० कि.मी.अंतरावर आहे. त्याची तीव्रता वाढून त्याचे पुढील १२ तासांत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात व त्यानंतरच्या २४ तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात पाकिस्तानच्या किनाऱ्याला धडकण्याचीही शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT