Delhi Rain 
देश

विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह पाऊस, राजधानीला अवकाळीने झोडपलं

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीत मंगळवारी दिवसा कडक ऊन होतं. तर रात्रीच्या सुमारास वेगवान वाऱ्यासह पावसाने झोडपलं.

नवी दिल्ली - दिल्लीसह (Delhi) आसपासच्या परिसरात आज अचानक पाऊस (Rain) झाला. यामुळे वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं दिसून आलं. दिल्लीत मंगळवारी दिवसा कडक ऊन होतं. तर रात्रीच्या सुमारास वेगवान वाऱ्यासह पावसाने झोडपलं. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने दिल्लीसह परिसरात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली होती.

हवामान विभागाने रात्री पावसाचा इशारा दिला होता. दिल्लीतील नरेला, बवाना आणि हरयाणातील सोनीपत, गुरुग्राममध्ये पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. याशिवाय उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील काही भागात पाऊस पडेल असंही सांगण्यात आलं होतं.

दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आता पावसामुळे उत्तर प्रदेशातील काही भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वीजांसह पाऊस आणि बर्फवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT