Weather Update Today | Rain Updates
Weather Update Today | Rain Updates esakal
देश

Weather Update : पुढील 5 दिवसांत 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

पुढील काही दिवस मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.

Weather Update Today : देशातील अनेक राज्यांना मान्सूननं (Monsoon) दणका दिलाय. आता उत्तर भारताकडं वाटचाल होत असली, तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. कर्नाटक (Karnataka), केरळ, गोवा आदी राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.(Rain Updates)

याशिवाय, बिहार-झारखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम झालाय. पुढील काही दिवस मुंबईत (Mumbai) पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. रायगड आणि पुण्यासह महाराष्ट्रातील (Maharashtra) पाच जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय. IMD नं गुरुवारी वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. मुंबई करता दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. इथंही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

'या' राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार

हवामान खात्यानं ट्विट करून येत्या काही दिवसांच्या हवामानाची माहिती दिलीय. कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ इथं पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असं हवामान खात्यानं (Weather Department) म्हटलंय. मध्य महाराष्ट्रात 24 ते 26 जून, कर्नाटकात 24 ते 25 जून, गुजरातमध्ये 25 आणि 26 जूनला पाऊस पडेल. तर, दुसरीकडं बंगालच्या उपसागरापासून ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतापर्यंत दक्षिण, नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावामुळं 25 आणि 26 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, 23 आणि 24 तारखेला विदर्भात पाऊस पडेल. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिमझिम सातत्यानं सुरूय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT