Ratan Tata joins Instagram 
देश

'वेलकम बॅक, एअर इंडिया,' रतन टाटांचं खास टि्वट

तब्बल ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी झाली आहे.

दीनानाथ परब

मुंबई: आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाचे (air india) अखेर टाटा समूहाने (tata group) अधिग्रहण केले आहे. एअर इंडिया विकत घेण्यासाठी लावलेली बोली टाटा समूहाने जिंकली आहे. तब्बल ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी झाली आहे. एअर इंडिया खरेदी करण्याची बोली जिंकल्यानंतर टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी 'वेलकम बॅक, एअर इंडिया' असे खास टि्वट केले आहे.

रतन टाटा यांनी टि्वट करताना जेआरडी टाटा यांचा एअर इंडियाच्या विमानासोबतचा एक जुना फोटोही पोस्ट केला आहे. "हे अधिग्रहण खूप चांगली बातमी आहे. या व्यवहारातून टाटा ग्रुपला हवाई उद्योग क्षेत्रात एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल" असा विश्वास रतन टाटा यांनी व्यक्त केला आहे.

"जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने ऐककाळी जगातील एक प्रतिष्ठीत एअरलाईन्स सेवा देणारी कंपनी असल्याचा मान मिळवला होता. सुरुवातीच्या काळात जी प्रतिष्ठा मिळाली होती, पुन्हा तशीच प्रतिमा निर्माण करण्याची टाटांना संधी आहे" असे रतन टाटा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. "आज जेआरडी टाटा असते, तर त्यांना प्रचंड आनंद झाला असता" असे टाटा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

1932 मध्ये टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचं स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झालं आणि एअर इंडिया असं त्याच नामांतरण झालं. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

तसं मोदी सरकारने 2018 मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.त्यासाठी टाटा कंपनीने देखील बोली लावली होती. आज टाटाने बोली जिंकली असून तब्बल ५३ वर्षानंतर एअर इंडियाची टाटाकडे लवकरच घरवापसी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT