welcome new puppies with traditional ceremonies video viral 
देश

Video: कुत्र्याच्या पिल्लाचे घरात अनोखे स्वागत!

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, काही व्हिडिओ वेगाने व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ म्हणजे कुत्र्याच्या पिलाचे घरात झालेल्या स्वागताचे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. अनेकांच्या कुटुंबातील तो सदस्य असतो. मुलांप्रमाणे त्यांचे लाड केले जातात. कुत्रा आणि कुटुंबातील सदस्यांचे एक नाते निर्माण होते. कुत्रा अनेकदा कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना दिसतो. शिवाय, प्राणाची बाजी लावून संरक्षण करताना दिसतो. प्राणी आणि मनुष्यांच्या प्रेमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडिओ आहे की, ज्यामध्ये कुत्र्याच्या पिल्लाचे घरात अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'एखाद्या नव्या नवरीने नव्या घरात प्रवेश करावा त्याप्रमाणे कुत्र्याच्या पिल्लाचे स्वागत करण्यात आले आहे. कुत्र्याच्या पिल्लाल घरात आणण्यापूर्वी दरवाज्यात फुले टाकलेली आहेत. पंजाना लाल रंगाच्या थाळीमध्ये बुडवून एका पांढऱ्या कागदावर त्याच्या पंजाचे निशाण घेतले. घरातील दुसऱ्या एका युवतीने त्याला ओवाळून टिळा लावला आणि त्याच स्वागत केले. त्याच्यावर फुलाच्या पाकळ्यांचा वर्षावही केला. मिठाई खायला देऊन त्याचे तोंड गोड करण्यात आले. शिवाय, कभी खुशी कभी गम चित्रपटाचे टायटल गाणेही लावले आहे.'

दरम्यान, कुत्र्याच्या पिल्लाचे अनोख्या पद्धतीने झालेल्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT