congress
congress 
देश

West Bengal Assembly Election: भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसचा डाव्यांसोबत प्लॅन

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा (West Bengal Assembly Election) निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डाव्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि पश्चिम बंगालचे राज्य अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी याची घोषणा केली. 

अधीर रंजन चौधरी यांनी यासंबधी ट्विट केलं आहे. आज काँग्रेस वरिष्ठ नेतृत्वाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी डाव्या पक्षांसोबत आघाडी करण्यास मंजूरी दिली आहे, असं ते म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल अध्यक्ष चौधरी यांनी म्हटलं होतं की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडी करणे आवश्यक आहे. त्यानंतर गुरुवारी काँग्रेस नेतृत्वाने डाव्यांसोबत आघाडी करण्यास मंजूरी दिली. 

2016 मध्ये पक्षाचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी होते. त्यावेळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. पण, 2019 त्या लोकसभा निवडणुकीत प्रयत्न करुनही दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊ शकली नव्हती. पण, यावेळी उभय पक्षांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे. दुसरीकडे भाजपने आपले लक्ष पश्चिम बंगालमध्ये एकवटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वारंवार पश्चिम बंगालचा दौरा करत आहे. त्यांनी ममतादीदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपचा गळाला लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री विराजमान होतात की भाजप आपले सरकार स्थापन करते, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT