mamta banerjee 
देश

West Bengal Assembly Election : "लवकरच भारतही मोदींच्या नावानं ओळखला जाईल"; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगला आहे. राज्यात लसीकरणादरम्यान मोदींचा फोटो वापरल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपाला फटकारल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपावर सडकून टीका केली. ही कोविड लस नव्हे, मोदी लस आहे, अशा शब्दांत ममतांनी मोदींवरही जोरदार हल्ला चढवला. तसेच भारतही लवकरच मोदींच्या नावाने ओळखला जाईल असा खोचक टोला लगावला.

बॅनर्जी म्हणाल्या, "लसीच्या प्रमाणपत्रावर त्यांनी आपला फोटो वापरला. ही कोविड लस नव्हे मोदी लस आहे. त्यांनी कॉलेजेसला, स्टेडिअमला आणि लसीला आपलं नाव दिलं. हा काळाचा महिमा आहे. ते लवकरच भारताचं नावही बदलून आपलं नाव ठेवतील."   

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या लसीकरणादरम्यान लस घेतलेल्या लोकांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो वापरण्यात येत होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत हा प्रकार आदर्श आचारसंहितेचे उल्लघन असल्याचं म्हटलं होतं. 

त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ क्रिकेट स्टेडिअम अशी ओळख असलेल्या गुजरातमधील वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडिअमचं नाव बदलून मोदी स्टेडिअम ठेवण्यात आलं आहे. यावरुनही देशाच्या राजकारणात मोठा खळबळ उडाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT