Locket_Chatterjee 
देश

भाजप महिला नेत्यावर हल्ला; चेहऱ्यावर फेकला रासायनिक रंग

वृत्तसंस्था

West Bengal Assembly Election 2021: कोलकाता : पश्चिम बंगालच्या हुगळी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार आणि चुंचुडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर रासायनिक रंग फेकण्यात आला. हा रंग त्यांच्या चेहऱ्यावर पडल्याने त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

चुंचुडा येथील रविंद्रनगरच्या कालीटला भागात वसंतोत्सवादरम्यान ही घटना घडली. कोदालिया-२ ग्रामपंचायतीचे प्रमुख विद्युत विश्वास यांच्या नेतृत्वात काही अज्ञात लोकांनी हा हल्ला केल्याचे भाजपने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना चॅटर्जीं म्हणाल्या की, मला इजा पोहचवण्यासाठी रासायनिक रंग माझ्यावर फेकण्यात आले. माझ्यावर हल्ला करणारे लोक कोण आहेत हे पाहण्यासाठी जेव्हा मी पुन्हा त्यांच्याकडे पाहिले तेव्हा टीएमसीचे बॅजेस घातलेले ३-४ लोक दिसले. 

पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा पहिला टप्पा शनिवारी पार पडला. पश्चिम बंगालमध्ये ७९.७९ तर आसाममध्ये ७२.१४ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील ३० तर आसाममधील ४७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. यासाठी २१,८२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये १०,२८८ ईव्हीएम आणि तेवढ्याच व्हीव्हीपॅट मशिन वापरण्यात आल्या होत्या. तर आसाममध्ये ११,५३७ ईव्हीएम आणि ३७ व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात आला. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

SCROLL FOR NEXT