mamata banerjee
mamata banerjee 
देश

भाजपला झटका; भवानीपूर पोटनिवडणूक ठरल्याप्रमाणंच होणार

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका कोलकाता हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ३० सप्टेंबर रोजीच होणार आहे. प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या हिंसक गोंधळानंतर भाजपकडून ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

सोमवारी प्रचारादरम्यान भाजपचे नेते दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा भाजपनं आरोप केला होता. यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी ही पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत होते. तर दुसरीकडे स्वप्नदास गुप्ताने निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्याची मागणी केली होती. तसेच सीआरपीएफच्या उपस्थितीत निवडणूक घेण्याची मागणी केली होती.

भवानीपूरमधून ममता बॅनर्जी लढवणार निवडणूक

भवनीपूर या जागेवरुन तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपकडून प्रियंका टिबरेवाल यांना मैदानात उतरवलं आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मे महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला होता. तरीही त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्व मिळवण्यासाठी एखाद्या जागेहून निवडणूक येणं गरजेचं होतं. त्यामुळे ममतांसाठी तृणमूलचे आमदार शोभन देव चटोपाध्याय यांनी राजीनामा दिला होता. म्हणून आता इथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर राहुल त्रिपाठी बाद, पण अभिषेक शर्मानं झळकावलं अर्धशतक; हैदराबादच्या 100 धावा पार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT