mamta banerjee Sakal
देश

पश्चिम बंगाल पोटनिवडणूक : ममतांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाला सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

ममतांना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इथून लढत असल्यानं याकडे लक्ष लागून राहिलं आहे. भवानीपूरशिवाय जंगीपूर आणि समसेरगंज या मतदारसंघातही मतदान होत असून सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतमोजणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

भवानीपूर मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री पदी कायम रहायचं असेल तर विधानसभेचं सदस्य असणं गरजेचं आहे. ममतांना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ममतांसाठी भवानीपूरमधील सोभानदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा देत जागा रिकामी केली.

ममतांविरोधात भाजपच्या प्रियांका टिबरवाल या निवडणूक लढवत आहेत. पेशाने वकील असलेल्या प्रियांका टिबरवाल या भाजपच्या पश्चिम बंगाल युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेविरोधात त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी आणि तपास सीबीआय़कडे सोपवला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी भाजपला नमवलं होतं. २९४ पैकी त्यांनी २१३ जागा जिंकल्या. भाजपचा राज्यात पराभव झाला असला तरी त्यांनी राज्यात दोन नंबरचा पक्ष म्हणून स्थान निर्माण केलं. भाजपने पश्चिम बंगालमध्ये ७७ जागा जिंकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

Maharashtra Live News : उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेर थरार; डोक्यात दोन गोळ्या झाडून हरीश गजवानी यांची भररस्त्यात हत्या

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

SCROLL FOR NEXT