Mamata Banerjee on Netaji Statue e sakal
देश

इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा फक्त आमच्या दबावामुळे - ममता बॅनर्जी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली. त्यावरूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पुतळा बसवण्याचा निर्णय फक्त आमच्या दबावामुळे घेतल्याचं ममता म्हणाल्या. नेताजींच्या १२५ व्या (Netaji Subhashchandra Bose 125th Birth Anniversary) जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

तुम्हाला पश्चिम बंगालची अॅलर्जी का आहे? आधी २६ जानेवारीच्या आमच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. आता नेताजींचा पुतळा बसवण्याचा निर्णय फक्त आमच्या दबावामुळे घेण्यात आला. पण, पुतळा बसवला म्हणून जबाबदारी संपत नाही, असं ममता म्हणाल्या.

आजपर्यंत तुम्हाला नेताजींचा ठावठिकाणी माहिती नाही. आम्ही सत्तेवर आल्यावर ते काम करू असं केंद्र सरकारने सांगितलं होतं. पण, प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. खरंतर पश्चिम बंगाल सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्यावरील सर्व फायली उघड केल्या आहेत, असंही ममता म्हणाल्या. बंगाल नसता तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मला बंगाली असण्याचा अभिमान वाटतो, असंही ममता म्हणाल्या.

अमर जवान ज्योतीचं विलनीकरण करण्यात आलं. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रचंड टीका केली. त्यानंतर मोदींनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्याची घोषणा केली. तसेच पुतळा तयार होतपर्यंत होलोग्राम पुतळा याचठिकाणी असेल. या पुतळ्यामुळे देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असं मोदी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT