Police investigate the Durgapur private medical college after a student was allegedly gang-raped, sparking outrage across West Bengal.
esakal
Gang-Rape on Medical Student in West Bengal Durgapur: पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवस आधीच भाजप महिला खासदारास अज्ञात लोकांनी हल्ला करून, गंभीर जखमी केले होते. तेच आता पुन्हा एकदा बंगालमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दुर्गापूरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ओडिशाची रहिवासी असणाऱ्या एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीवर अज्ञातांनी कथितरित्या बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी रात्री दुर्गापूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालय परिसराच्या जवळ घडली. प्राप्त माहितीनुसार ही विद्यार्थीनी आपल्या मैत्रिणीसोबत रात्री जेवणासाठी बाहेर गेली होती.
यावेळी या विद्यार्थीनीवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, सूनसान जागेवर अत्याचार केले गेले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ओडिशाची रहिवासी असणाऱ्या या वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर रूग्णालयात उपाचार सुरू आहेत. तर पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी तपास सुरू झाला आहे.
याशिवाय पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, ही विद्यार्थीनी शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान आपल्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या बाहेर गेली होती. दरम्यान, तीन अज्ञात व्यक्ती तिथे आल्यानंतर, तिची मैत्रीण तिला एकटीला सोडून पळून गेली. यानंतर मग त्या तिघांनी सर्वप्रथम पीडित विद्यार्थीनीचा मोबाइल हिसकावला आणि तिला कॉलेज कॅम्पसच्याही बाहेर सूनसान जागेवर बळजबरी घेवून गेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला धमकीही दिली गेली की जर तिने या बाबत कुणालाही सांगितलं, तर तिला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. तसेच यानंतर मग पीडित विद्यार्थीनीचा मोबाइल परत करण्यासाठी तिच्याकडून पैसे मागितले गेले.
पोलिसांनी पीडित विद्यर्थीनीचा जबाब नोंदवून घेतला आहे. शिवाय पोलिसांनी पीडित विद्यार्थीनीच्या मैत्रिणीचीही चौकशी केली आहे आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पाहणी करणार आहे. याशिवाय, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही पीडित विद्यार्थीनी आणि तिच्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी दुर्गापूर येथे जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.