SUENDU MAMATA.jpg
SUENDU MAMATA.jpg 
देश

'होळी मुबारक' म्हणणाऱ्या 'ममता बेगम'ना मते दिल्यास होईल 'मिनी पाकिस्तान'

सकाळवृत्तसेवा

कोलकाता : एकेकाळी ममतांच्या मर्जीतले असणारे सुवेंदु अधिकारी  यांनी सध्या आपला पक्ष बदलून भाजपकडून थेट ममतांनाच आव्हान दिलं आहे. नंदीग्राम मतदार संघामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सुवेंदु अधिकारी यांच्यात 'काँटे की टक्कर' पहायला मिळत आहे. आणि आता निवडणुकीतील प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर अधिकारी यांनी धार्मिक तुष्टीकरणाचा आरोप ठेवला आहे. त्यांनी हा आरोप करताना ममतांचा उल्लेख 'बेगम' असा केला आहे. त्यांनी म्हटलंय की, बेगम अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यात व्यस्त आहेत. त्यांना ईद मुबारक म्हणण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांनी होळीच्या दिवशी हिंदू लोकांना होळीच्या शुभेच्छांऐवजी 'होळी मुबारक' अशाच शुभेच्छा दिल्या आहेत. हे जर असेच सुरू राहिले तर एक दिवस बंगालचा मिनी पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही.

सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, मतदारांनी सतर्क होण्याची गरज असून ममता यांना मत दिल्यास बंगालचा मिनी पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, नंदिग्राम येथील विधानसभा निवडणुका 1 एप्रिल रोजी होणार असून ममता बॅनर्जी व सुवेंदू अधिकारी एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या विकासाबाबत बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा विकास केला असून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर बंगालचा देखील उत्तर प्रदेशसारखाच विकास करू, असे आश्वासनही अधिकारी यांनी दिले. 

सुवेंदु अधिकारी यांनी पुढे म्हटलं की, बेगमला मत देऊ नका. जर तुम्ही बेगमला मत द्याल तर इथे मिनी पाकिस्तान बनेल. बेगम सुफियान शिवाय इतर कुणालाही ओळखत नाहीत. बेगम आता अचानकच बदलल्या आहेत आणि त्या आता मंदिरांच्या चकरा मारत आहेत कारण त्यांना आता पराभवाची भीती वाटत आहे.  ममता आणि सुवेंदु अधिकारी दोघेही एकमेकांना आरोप-प्रत्यारोपांचे जबरदस्त तडाखे देत आहेत. नंदीग्राममध्ये येत्या गुरुवारी मतदान होणार आहे. दुसरीकडे तृणमूलने सुवेंदु अधिकारी यांना गद्दार ठरवलं असून ते उत्तर प्रदेशातील गुंडाची मदत घेत असल्याचं म्हटलं आहे. तर अधिकारी यांनी म्हटलंय की, भाजपची सत्ता आल्यानंतर ते बंगालमध्ये योगींसारखे प्रशासन आणतील. योगी आदित्यनाथ ज्या पद्धतीने प्रशासन चालवत आहेत, त्याच पद्धतीने आम्ही देखील शासन करु. जर उत्तर प्रदेश परिवर्तन करु शकतो तर आम्ही देखील करु शकतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT