Mamata Banerjee:
Mamata Banerjee: 
देश

Mamata Banerjee: ''राम आठवला, पण उशिरा''; पश्चिम बंगाल सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

कार्तिक पुजारी

Ram Navami Holiday: लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. प्रत्येक पक्षाने आपापल्या परिने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने विविध महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा, काली पूजा आणि सरस्वती पूजेला जास्त महत्त्व आहे. पण, काही दिवसांपासून राम नवमी आणि हनुमान जयंती लोक साजरे करत असल्याच दिसून येत आहे. अशा लोकांची संख्या वाढली आहे. यावर्षी १७ एप्रिलला रामनवमी आहे.(West Bengal Government declared 17 April 2024 as a public holiday on the occasion of Ram Navami)

रामनवमीच्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपासून सातत्याने हिंसक घडना घडल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी देखील हिंसा झाली होती. या मुद्द्यांवर भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. ममता या तुष्टीकरणाचं राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यात, यावर्षी ममता यांनी रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करुन महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

भाजपकडून टीका

भाजपने ममता बॅनर्जी यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांना जय श्री राम ऐकूनच राग येतो. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आपली हिंदू विरोधी प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण, आता खूप उशीर झाला आहे. तरी, रावनवमीच्या यात्रेवर दगडफेक होणार नाही याची काळजी घेतली जावी. दगडफेक होणार नाही याची काळजी घेतली जाईल का? जय श्री राम, असं आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणालेत.

देशामध्ये काही महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. अनेक सर्व्हेमध्ये भाजपला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करुन पंतप्रधान मोदी यांनी उत्तरेतील राज्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याला उत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT