west bengal fire break 
देश

Breaking : कोलकात्यातील अग्नितांडवात ७ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री ममता घटनास्थळी

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील बडा बाजार भागातील इमारतील भीषण आग लागली आहे. स्ट्रँड रोडवरील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर लागेल्या या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

आगीची घटना घडताच परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. आजुबाजुच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून लोकांना घटनास्थळाकडे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

फायर अँड इमर्जन्सी सर्विसेसचे अधिकारी सुजित बोस यांनी सांगितलं की, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्य सुरु असून रात्री उशिरा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी बचावकार्य वेगानं करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीतून आगीचे लोट दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या इमारतीमध्ये रेल्वेचं कार्यालयसुद्धा आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इमारत रिकामी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT