Bengal polling booths were covered with nylon nets esakal
देश

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Lok Sabha 2024: निवडणुकीच्या तयारीसाठी 12 किमी लांबीच्या सुंदरबनला नवीन नायलॉन जाळी लावण्यात आली आहे. या उपायाचा उद्देश लाहिरीपूर आणि जेम्सपूर सारख्या गावांमध्ये वाघाचा हस्तक्षेप रोखणे आणि मतदान सुरळीत पार पडणे आहे.

Sandip Kapde

Lok Sabha 2024:

कोलकाता: लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. दोन टप्यातील मतदान संपले असून ७ मे ला तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. भारतात असेही निवडणूक केंद्र आहेत जिथं मतदानासाठी मोठी कसरत करावी लागते. पश्चिम बंगालमध्ये वाघांपासून सुरक्षेसाठी नायलॉनच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत.  वाघांना मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्यापासून रोखण्यासाठी ह्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधील लाहिरीपूर, जेम्सपूर, कुमिरमारी, छोटा मोल्लाखली आणि झारखली गावांच्या काठावर १२ किमी लांबीच्या नदीच्या काठावर नवीन नायलॉनच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून मतदानासाठी बाहेर पडलेल्या लोकांची सुरक्षा होईल.

जयनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत गोसाबा आणि कुलतली विधानसभा मतदारसंघात पसरलेल्या या गावांमध्ये ५ लाखांहून अधिक मतदार आहेत. तर ताज्या जनगणनेनुसार किमान १०१ वाघ आहेत. नदीकाठावर असलेल्या या गावांमध्ये किमान ५७ मतदान केंद्रे आहेत.

"निवडणूक जवळ आल्याने, दक्षता वाढवण्यात आली आहे आणि १२ किमी जुने कुंपण बदलण्यात आले आहे," असे उपक्षेत्र संचालक जस्टिन जोन्स यांनी सांगितले. आपले सर्वाधिक लक्ष या संवेदनशील भागात असलेल्या बूथवर असल्याचे त्यांनी सांगितले.

जंगलाच्या काठावर बाड, गोमोर, बिद्या, पिचखली आणि कपूरा या नद्यांच्या काठावर लावलेल्या जाळ्या अनेक वर्षापासून मानव-प्राणी संघर्ष रोखण्यात मदत करतात. सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात १०६ किमी नायलॉन जाळीचे कुंपण आहे आणि मोसमी वादळ, मातीची चोरी किंवा मानवी क्रियाकलापांमुळे होणारे कोणतेही उल्लंघन यावर वनअधिकारी सतत लक्ष ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

Onion : मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना; फिरत्या वाहनाद्वारे विक्री

Nashik News : छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

ODI World Cup सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार क्रिकेटर झाली संघाबाहेर; बदली खेळाडूचीही घोषणा

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

SCROLL FOR NEXT