TMC MLA Sabitri Mitra Mukherjee esakal
देश

TMC MLA : मी 'त्यांची' माफी का मागायची? मोदी-शहांना दुर्योधन-दुशासन म्हणणाऱ्या आमदार स्पष्टचं बोलल्या

भाजप नेत्यांनी टीएमसी कुत्र्यांचा पक्ष असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची तुलना 'सुपर्णखा'शी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेत्यांनी टीएमसी कुत्र्यांचा पक्ष असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची तुलना 'सुपर्णखा'शी केली होती.

TMC MLA Sabitri Mitra Mukherjee : पश्चिम बंगालच्या आमदार आणि टीएमसी महिला नेत्या सावित्री मित्रा मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यामुळं वादात सापडल्या आहेत.

रविवारी आपल्या मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करताना सावित्री मुखर्जी म्हणाल्या, "मी अमित शहाजी (Amit Shah) आणि मोदीजींना (Narendra Modi) एवढंच सांगेन की, तुम्ही सर्वजण दुर्योधन आणि दुशासन आहात." या वक्तव्यानंतर भाजप आमदारांनी विरोध केलाय. बंगालच्या विधानसभेबाहेर सावित्री मुखर्जी यांच्या विरोधात निदर्शनं करून माफीची मागणी केली. त्यानंतर मुखर्जी यांनी मी माफी का मागू? असं म्हणत पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शाह यांना 'दुर्योधन आणि दुशासन' म्हटलं नाही, असं स्पष्ट केलं.

'त्या गोष्टीबद्दल मला वाईट का वाटावं..'

सोमवारी भाजप आमदारांनी पश्चिम बंगाल विधानसभेबाहेर (West Bengal Legislative Assembly) सावित्री मित्रा यांच्या विरोधात निदर्शनं केली आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, इंडिया टुडेशी बोलताना आमदार सावित्री मुखर्जी यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. टीएमसी नेत्या सावित्री मुखर्जी म्हणाल्या, "मी न बोललेल्या वक्तव्यासाठी माफी का मागू?" त्या गोष्टीची मला खंत का वाटावी..? मी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांना 'दुर्योधन आणि दुशासन' म्हटलं नाही. भाजप नेत्यांनी टीएमसी कुत्र्यांचा पक्ष असल्याचं म्हटलं आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची तुलना 'सुपर्णखा'शी केली. भाजप नेत्यांनी केलेल्या अशा अपमानास्पद वक्तव्यावर ही माझी प्रतिक्रिया होती, असं मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

सावित्री मित्रांच्या वक्तव्याचा निषेध करणारे भाजप आमदार अग्निमित्रा पॉल म्हणाले, 'देशातील सर्वोच्च नेत्यांच्या विरोधात असभ्य भाषा वापरण्याची ही संस्कृती टीएमसी नेत्यांमध्ये आहे. आम्हाला आश्चर्य वाटतं की, असं वक्तव्य करण्याचं धैर्य त्याच्याकडं कुठून येतं? वास्तविक, ममता बॅनर्जी त्यांना प्रोत्साहन देतात. कारण, त्या स्वतः अशी भाषा वापरतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT