West Bengal Violence esakal
देश

जिवंत जाळण्यापूर्वी लोकांना बेदम मारहाण; शवविच्छेदन अहवालात खुलासा

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार घटनेत एक खळबळजनक बाब समोर आली आहे. बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई (Bogtui) गावात जिवंत जाळलेल्या तीन महिला आणि दोन मुलांसह आठ जणांना हत्याकांडाच्या आधी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती, त्यांच्या फॉरेन्सिक तपासणी तसेच शवविच्छेदन अहवालात ही बाब उघड झाले आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, पीडितांना प्रथम बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले, असे रामपूरहाट रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. फॉरेन्सिक तज्ञांनी मंगळवारी पहाटे अज्ञात लोकांनी कथितरित्या जाळलेल्या लोकांच्या मृतदेहांची तपासणी केली होती.

या घटनेप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे रामपूरहाटच्या बोगतुई गावात डझनभर घरे जाळण्यात आल्याने दोन मुलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) पंचायत स्तरावरील नेते भादू शेख यांच्या कथित हत्येच्या काही तासांतच ही घटना घडली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई गावाला भेट दिली. यावेळी ममता म्हणाल्या की, बहाणे चालणार नाही, जे या घटनेसाठी जबाबदार आहेत, त्यांना तात्काळ ताब्यात घ्या. बंगालमध्ये हे असं होऊ शकतं असं मला कधीच वाटलं नव्हतं. एका आई आणि मुलाचा या घटनेत मृत्यू झाला. हे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप करत बॅनर्जी यांनी कठोर कारवाईची घोषणा केली आहे. तसंच हत्येमागील कारणांचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT