Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal: जर्मनीपाठोपाठ अमेरिका केजरीवालांबद्दल काय बोलली? भारताने स्पष्टपणे फटकारले...

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने केलेल्या टिकेवर भारताने मोठा विरोध केला आहे.

Sandip Kapde

Arvind Kejriwal:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने केलेल्या टिकेवर भारताने मोठा विरोध केला आहे. भारताने दिल्लीत असलेले अमेरिका दुतवासातील प्रभारी उपप्रमुख ग्लोरिया बारबेना यांना समन्स बजावले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि ग्लोरिया बारबेना यांच्यात सुमारे ४० मिनिटे बैठक झाली. भारताने स्पष्टपणे सांगितले की ही आमची अंतर्गत बाब आहे त्यामुळे कोणताही हस्तक्षेप करु नये.

"भारतातील काही कायदेशीर कार्यवाहींबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या टिप्पण्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. मुत्सद्देगिरीमध्ये देशांनी इतरांच्या सार्वभौमत्वाचा आणि अंतर्गत बाबींचा आदर करणे अपेक्षित आहे. ही जबाबदारी बनते. भारतातील कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर आधारित आहेत. त्यावर आक्षेप घेणे अयोग्य आहे," असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काट म्हटले होते?

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि प्रमुख विरोधी पक्षनेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी संबंधित अहवालांवर ते सतत लक्ष ठेवून आहेत. केजरीवाल यांच्या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेवर कायदेशीर प्रक्रियेची अपेक्षा असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.


केजरीवाल यांच्या अटकेवरील ही दुसरी आंतरराष्ट्रीय टिप्पणी आहे. गेल्या आठवड्यात जर्मनीनेही असेच विधान केले होते. जर्मन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केजरीवाल यांच्या अटकेची दखल घेतली होती. यानंतर भारताने शनिवारी येथील जर्मन दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत जर्मन परराष्ट्र मंत्रालयाच्या टिप्पणीचा तीव्र निषेध नोंदवला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT