लखनौ - राज्यसभेचे खासदार आणि आम आदमी पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रभारी संजय सिंह यांच्या ‘विजयी रोड शो’चे रविवारी आयोजन केले होते. 
देश

‘आम आदमी’चे लक्ष्य आता कोणते? ते वाचा

पीटीआय

लखनौ - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केलेल्या आम आदमी पक्षाचा (आप) आत्मविश्वास सध्या वाढला आहे. दिल्लीतील मोठ्या विजयानंतर ‘आप’ने आता उत्तर प्रदेशवर लक्ष्य केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.

दिल्लीतील विकासाच्या मॉडेलचा दाखला देत ‘यूपी’त आप मते मागणार आहे, असे आज पक्षाकडून सांगण्यात आले. राज्यात पारदर्शी सरकारने देण्याचे आश्वासनही ‘आप’कडून दिले जात आहे.

‘आप’चे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजयसिंह यांनी दावा केला की, दिल्लीतील विकासाच्या मॉडेलसमोर भाजपचे गुजरात मॉडेल फिके पडले आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोचणार असून, त्यांना ‘आप’च्या दिल्लीतील सरकारने राबविलेला विकासाचा अजेंडा आणि योजनांची माहिती देणार आहेत.  राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशात स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभेची निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर लढविण्यात येईल. दिल्लीतील विकासाच्या मॉडेलच्या आधारे आम्ही मते मागणार आहोत, अशी माहिती संजय सिंह यांनी दिली.  दिल्लीत निवडून आलेले ‘आप’चे १५ आमदार हे उत्तर प्रदेशातील आहेत. या आमदारांवर पक्षाने जबाबदारी सोपविली असून, उत्तर प्रदेशात पक्षाचा जनाधार वाढविण्याचे लक्ष्य त्यांना दिले आहे. 

मतदार हे द्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन विकासाच्या राजकारणाला आपलेसे करतात हे दिल्लीतील निवडणुकीत दिसून आले आहे, असेही संजय सिंह यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT