Atiq Ahmed Murder Case Sakal
देश

Atik Ahmed Case : बोलता बोलता अचानक डोक्यात बसली गोळी; काय होते गँगस्टर अतिक अहमदचे शेवटचे शब्द?

अतिकच्य़ा डोक्यावर पिस्तुल रोखून त्याला गोळी झाडण्यात आली, याचा व्हिडीओ समोर आला आहे.

वैष्णवी कारंजकर

माजी खासदार आणि कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची काल पोलीस बंदोबस्त असतानाही हत्या करण्यात आली आहे. या दोघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. नक्की घडलं काय? जाणून घ्या...

अतिक अहमद आणि अशरफ अहमद हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. आज त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आणण्यात आलं होतं. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तिथे काही वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी अतिकशी बोलत होते. त्याचवेळी मारेकऱ्यांनी पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार केला.

या गोळीबारामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचाही गोंधळ उडाला. अतिकच्या थेट डोक्यात गोळी मारली, पुढे अशरफलाही गोळी लागली. हे सगळं कॅमेऱ्यासमोर घडल्याने ही घटना रेकॉर्ड झाली.

हे होते अतिकचे शेवटचे शब्द...

माध्यम प्रतिनिधींनी अतिकला विचारलं की, तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं नाही, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? अतिक म्हणाला,"आम्हाला नेलं नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की..." एवढं बोलताच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अतिक अहमद याचा मुलगा असद याचंही दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्याचे अंत्यसंस्कार कडक पोलिस बंदोबस्तात पार पडले. या अंत्यसंस्काराला केवळ २५ लोक उपस्थित होते, तसंच ड्रोनद्वारे यावर नजर ठेवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT