देश

काय आहे वार्म व्हॅक्सीन? या लशीची एवढी चर्चा का होतेय?

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात लढा सुरु आहे. कोरोनाच्या संसर्गावर अद्यापतरी कोणतंही प्रभावी औषध उपलब्ध झालेलं नाहीये. कोरोनाविरोधातल्या या लढाईत एकीकडे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर प्रभावी आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या देशांनी विविध लशी उपलब्ध केल्या आहेत. सध्या जगभरात कोवीशील्ड, कोवॅक्सीन, स्पुटनिक व्ही, फायझर मॉडर्ना यांसारख्या लशी उपलब्ध आहेत. या लशींच्या हाताळणीसाठी आणि त्या सुरक्षित राखण्यासाठी अत्यंत कमी तापमानाची गरज आहे. मात्र, आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सोसायटीच्या संशोधकांनी स्टार्ट अप फर्म असलेल्या मिनवॅक्ससोबत एक अशी लस तयार केली आहे, ज्या लशीला कमी तापमानाची गरज नाहीये. ही लस भारतात महत्त्वाची ठरु शकते. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात या लशीला निश्चितच महत्त्व प्राप्त होऊ शकतं. या लशीची चाचणी उंदरांवर केली आहे. तसेच या चाचणीचे निष्कर्ष देखील सकारात्मक आल्याचं सांगण्यात आलं आहे. यालाच वार्म व्हॅक्सीन किंवा थर्माटोलरंट व्हॅक्सीन असं म्हणतात.

काय आहे वार्म व्हॅक्सीन

सध्या उपलब्ध असणाऱ्या कोरोना लशींना सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत कमी तापमान म्हणजेच दोन ते आठ डिग्री तापमानाची गरज असते. काही लशींसाठी - 70 डिग्री तापमानाची देखील आवश्यकता असते. मात्र, आयआयएससीद्वारे तयार केलेली लस 37 डिग्री सेल्सियसवर एक महिने आणि 100 डिग्री सेल्सियसवर जवळपास दिड तासापर्यंत प्रभावी राहते. संशोधकांचं म्हणणं आहे की, जी व्हॅक्सीन अधिक तापमानावर देखील प्रभावी आणि तितकीच परिणामकारक राहू शकते, तिला वार्म व्हॅक्सीन असं म्हणतात.

संशोधकांचं काय आहे म्हणणं?

मेलबर्नच्या सीएसआयआरओच्या ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिसीज प्रीपेअर्डनेसच्या संशोधकांनी म्हटलंय की, लस दिल्यानंतर उंदरांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली गेली. या उंदरांना जगभरात संक्रमित झालेल्या डेल्टा व्हेरियंटसहित कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंटने संक्रमित केलं गेलं. प्रोजेक्ट लीडर डॉ. एस एस वासन यांनी म्हटलंय की, मिनवॅक्सची लस दिल्या गेलेल्या उंदरांमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्याची प्रतिकार शक्ती दिसून आली. आमचा डेटा असं सांगतो की, मिनवॅक्सने अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टासहित सर्वच व्हेरियंटविरोधात लढण्यासाठी प्रतिकार शक्ती प्रदान केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : भारतीय शेअर बाजाराची तेजीने सुरुवात; सेन्सेक्सने ओलांडला ८२६०० चा टप्पा, निफ्टीतही ७८ अंकांची वाढ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती

Marathwada Mukti Sangram Din : ..अन् मराठवाडा भारतात विलीन झाला! खेडोपाडी कशी झाली क्रांती? जाणून घ्या रक्तरंजित इतिहास

PM Narendra Modi lifestyle: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम कसा असतो? जाणून घ्या त्यांच्या लाइफस्टाइलविषयी!

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह पुढची मॅच नाही खेळणार; महत्त्वाचे अपडेट्स, IND vs OMN सामन्यात Playing XI कशी असणार?

SCROLL FOR NEXT