Rahul Gandhi Jiu-Jitsu Esakal
देश

Rahul Gandhi: राहुल गांधी खेळतात ते Jiu-Jitsu नेमकं काय? क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत भारत जोडो यात्रे बद्दल केली मोठी घोषणा

Rahul Gandhi Jiu-Jitsu Viral News: 2012 पासून दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक या दिवशी महान खेळाडू ध्यानचंद यांचा जन्म झाला होता.

आशुतोष मसगौंडे

Know What exactly is Jiu-Jitsu: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर राजकारणाच्या शैलीत मोठा बदल केला होता. त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी भारत जोडो यात्रा काढली.

कन्याकुमारी ते काश्मीर आणि नंतर मणिपूरपासून गुजरातपर्यंत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला नसला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा आकडा 99 पर्यंत नक्कीच वाढला.

राहुल गांधी समाजातील विविध घटकांना भेटतानाचे व्हिडिओही सतत प्रसिद्ध करत असतात. आता राहुल गांधी यांनी एक लेटेस्ट व्हिडिओ जारी केला आहे.

यामध्ये ते मार्शल आर्ट जिउ-जित्सूचा सराव करताना दिसत आहेत. राहुल यांनी हा व्हिडिओ शेअर करत राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान राहुल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भारत जोडो यात्रे बद्दल केली मोठी घोषणा

राहुल यांनी क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देताना शेअर केलेल्या व्हिडिओसोबत लिहिले की, "भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, आमच्या शिबिरात जिउ-जित्सूचा सराव आमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनला होता. या मार्शल आर्टच्या माध्यमातून आम्ही तरुणांना ध्यान, अहिंसा, स्वसंरक्षण आणि त्यांची शक्ती समजून देण्याचा प्रयत्न केला. ही हळुवार कला तरुणांमध्ये सहजतेने संवेदनशील आणि सुरक्षित समाजाचे माध्यम बनू शकते. हेच खेळाचे सौंदर्य आहे. तुम्ही कोणताही खेळ खेळलात तरी ते तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या मजबूत बनवते. आपणा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."

राहुल यांनी शेअर केलेल्या या पोस्टखाली एक ओळ लिहिली आहे. "भारत 'डोजो' यात्रा कमिंग सून." पण यामध्ये वापरलेला 'डोजो' शब्द मुद्दाम वापरला आहे की, चुकून झाले याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

जिउ-जित्सू म्हणजे काय?

जिउ-जित्सू हे ब्राझीलचे मार्शल आर्ट आहे. जिउ-जित्सूमध्ये प्रतिस्पर्ध्याला झेल देऊन नियंत्रित करावे लागते. त्याला BJJ असेही म्हणतात. कराटे आणि बॉक्सिंगप्रमाणे यात प्रतिस्पर्ध्याला दुखापत होत नाही. राहुल गांधी हे जिउ-जित्सूमध्येही ब्लू बेल्टधारक आहेत.

यापूर्वी एकदा राहुल गांधींनी समुद्रात पोहण्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. कुली, मोची, मोटरसायकल मेकॅनिक आणि डीटीसी बस ड्रायव्हर व्यतिरिक्त, राहुल गांधींनी ट्रकमधील प्रवासाचे व्हिडिओ देखील पोस्ट केले होते.

राष्ट्रीय क्रीडा दिन

2012 पासून दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक या दिवशी महान खेळाडू ध्यानचंद यांचा जन्म झाला होता.

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते. आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक गोल करणाऱ्या या महान खेळाडूच्या स्मरणार्थ भारत सरकारने 2012 पासून त्यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

1956 मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Pune News: मांढरदेवीच्या यात्रेला अभूतपूर्व गर्दी; भोर मार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, दाेन्ही बाजुला वाहतूक जाम!

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

Rhino Attacks Tiger : वाघाच्या जबड्यातून पिल्लाची सुटका! दुधवा जंगलात गेंड्याच्या मादीचा वाघावर थरारक हल्ला; दुर्मिळ दृश्य video viral!

Black Saree Look: काळ्या साडीतला बॉलिवूड टच देईल तुम्हाला एलिगंट अन् रॉयल लूक, कौतुक नक्की मिळेल!

SCROLL FOR NEXT