नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्याचे मंगळवारी प्रकाशन करताना (डावीकडून) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री गोपाल राय. 
देश

आम आदमी पक्षाचा काय आहे जाहीरनामा

पीटीआय

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षापाठोपाठ आज आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा आणला. आम आदमी पक्षाने दिल्लीकरांना उच्च दर्जाचे शिक्षण, आरोग्य सुविधा, स्वच्छ पाणी आणि चोवीस तास वीज देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत आपचा दिल्ली विधानसभेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनाम्यात समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केल्याचे केजरीवाल म्हणाले. मनीष सिसोदिया म्हणाले, दिल्ली आणि यमुनेला स्वच्छ करण्यात येईल, दिल्लीला प्रदूषणमुक्त करणे, चांगली आरोग्य सुविधा दिली जाईल, तसेच लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आम आदमी पक्षाचा संघर्ष सुरू राहील. घरपोच रेशन धान्य सुविधा, कर्तव्यावर असताना सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास एक कोटीची नुकसानभरपाई आदी आश्‍वासनांचा जाहीरनाम्यात समावेश आहे. 

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण
आम्हीही जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, भाजपनेदेखील केला आहे. या घोषणांवर चर्चा व्हायला हवी; परंतु जनतेला भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, हे जाणून घ्यायचे आहे. भाजपला दिलेले मत कोणाला जाईल, याचे उत्तर जनतेला हवे आहे. जर भाजपने उद्या दुपारी एकपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला तर आम्ही चर्चा करू. नाही तर उद्या आपण इथेच भेटू, असे केजरीवाल पत्रकारांना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT