Court Sakal
देश

मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे?

कोरोनाचा उद्रेकात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली.

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाचा (Corona) उद्रेकात ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता भासत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गुरुवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली. या साथीची तिसरी लाट येणार आहे, असे शास्त्रज्ञच (Scientist) सांगत आहे. त्यात लहान मुलांना (Child) संसर्गाचा (Disease) धोका (Danger) जास्त असल्याची शक्यता व्यक्त होत असून तसे झाले तर पालकांनी (Parents) काय करावे, असा सवाल करीत यासाठी नियोजन केले आहे, अशी विचारणा केंद्र सरकारकडे (Central Government) केली. (What parents should do if their children are affected)

न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम लहान मुलांसाठी सुरू करता येईल का, यावर विचार करण्याची सूचना केली. ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट अजून येणार आहे, अशा वेळी दिल्लीत ऑक्सिजनचे संकट येऊ नये. देशभरातील ऑक्सिजन पुरवठ्यावर सरकारने लक्ष द्यायला हवे. ऑक्सिजनचे ऑडिट करण्यावर आणि त्याचा पुरवठा करण्याच्या पद्धतीवर पुन्हा विचार करण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्या. एम. आर. शाह म्हणाले, ‘‘आपण फक्त दिल्लीबद्दल बोलत आहोत. मात्र भारतातील बहुतांश लोक खेड्यांमध्ये राहतात. दुर्गम भागासाठी काय नियोजन आहे. भविष्यातील तयारी कशी सुरु आहे. काही आपत्कालीन परिस्थिती आली तर कसे काम करणार आहात? तुम्ही इथे ऑक्सिजन घेऊन जायला कंटेनर नसल्याचे सांगताय तर भविष्यात कसे काम करणार?,’’ अशी प्रश्‍नांची सरबत्ती केली.

केंद्र सरकार तयारी करीत आहे

सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, उच्चस्तरीय बैठकांमध्ये निर्णय घेत जात आहे तर काही निर्णयांवर पुन्हा विचार होत आहे. आम्ही ऑक्सिजनचे टँकर पुरवत आहोत. एखाद्या रुग्णालयाप्रमाणे काम करणाऱ्या रेल्वेगाड्याही सरकार तयार करत आहेत. त्या गाड्या दुर्गम भागात जाऊन रुग्णांना सेवा देऊ शकतील, याबद्दल विचार सुरु आहे.

चुकीला सरकारच जबाबदार

तिसऱ्या लाटेमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त करत केंद्राने त्यासंदर्भातही नियोजन करावे. तिसरी लाट पाहून त्यासंदर्भातील धोरणे आखावीत असा सल्ला देत जर धोरण आखण्यात चूक झाल्यास त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे न्या. चंद्रचूड यांनी सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT