Narendra Modi_Draupadi Murmu 
देश

Narendra Modi: कुठं होणार नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी? नवी माहिती आली समोर

येत्या ९ जून रोजी संध्यकाळी हा शपथविधी पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावाही केला आहे. या शपथविधीची तारीख जाहीर झाली असली तरी ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालं नव्हतं. पण आता मोदींचा शपथविधी कुठे होणार? याची नवी माहिती समोर आली आहे. (What would place of swearing in ceremony of Narendra Modi as Prime Minister be held need to know)

मोदींची पीएमओवर नियुक्ती

मोदींनी राष्ट्रपतींकडं सर्वात मोठा पक्ष आणि बहुमत असल्याचं सांगत सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम ७५ (१) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींची आज पंतप्रधान कार्यालयावर नियुक्ती केली.

मोदींना राष्ट्रपती भवनाकडून विनंती

दरम्यान, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींकडं दोन विनंती केल्या आहेत. यांपैकी पहिली विनंती म्हणजे मोदींशिवाय ज्या खासदारांची केंद्रीय मंत्रीमंडळात नियुक्ती करायची आहे त्यांच्या नावाची यादी देण्यात यावी. तसेच शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ सूचित करण्यास सांगितलं आहे.

राष्ट्रपती भवनाचं अधिकृत निवेदन

राष्ट्रपती भवनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत निवदेनात स्पष्टपणे म्हटलं की, राष्ट्रपती भवनात पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ देण्यात यावी. पण याचपूर्वी मोदींनी ९ जून रोजी संध्याकाळी शपथविधी घेण्यास योग्य दिवस असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं आता हे स्पष्ट झालं आहे की, येत्या रविवारी, ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता 'राष्ट्रपती भवन'मध्ये मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी पार पाडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT