देश

जेव्हा मुख्यमंत्री सोनिया गांधींवर रागवतात...

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : चिटफंड विधेयकावरील चर्चेनंतर संसदेत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा (यूपीए) सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी समोरासमोर आल्या. त्यावेळी ममता यांनी सोनिया गांधी यांना "तुमच्या देखत तुमचे सदस्य आमच्या पक्षावर वाटेल ती टीका करीत होते व तुम्ही त्यांना रोखले नाहीत'' अशी तक्रार करत त्यांच्यावर संतापल्या.

संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ तृणमूल काँग्रेसतर्फे आयोजित 'लोकशाही बचाव आंदोलना'चा कार्यक्रम करण्यात आला. यासाठी ममता बॅनर्जी खास कोलकाता येथून आल्याने सर्व प्रमुख विरोधी पक्षनेते त्यात सामील झाले होते. कॉंग्रेसतर्फे खुद्द राहुल व सोनिया गांधी उपस्थित होत्या. मात्र, चिटफंड विधेयकावरील चर्चेनंतर संसदेतच सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी समोरासमोर आल्या. त्यावेळी ममता यांनी सोनिया गांधी यांना "तुमच्या देखत तुमचे सदस्य आमच्या पक्षावर वाटेल ती टीका करीत होते व तुम्ही त्यांना रोखले नाहीत' अशी तक्रार केली.

ममता विलक्षण रागात होत्या आणि सोनिया गांधी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करताच त्यांनी तो झिडकारला आणि तरातरा त्यांच्या समोरुन निघून गेल्या. सोनिया यांनी मात्र त्यांना काहीसे समजावणीच्या स्वरातच, "दो वुई ऍक्‍यूज इच आदर, वी स्टिल आर टुगेदर' असे म्हटले, पण ममतादीदी मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT