corona vaccination corona vaccination
देश

कोरोनातून बरं झाल्यानंतर लस केव्हा घ्यावी? केंद्राने केलं स्पष्ट

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोनातून बरे झाल्यानंतर लशीचा डोस केव्हा घ्यावा याबाबत केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल, तर तो बरा झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घेऊ शकतो. राष्ट्रीय तज्ञ गटाने यासंदर्भात केंद्राला शिफारस केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस स्वीकारली असून कोरोना झाल्यानंतर लशीचा डोस तीन महिन्यांनी घेता येणार आहे. ज्यांनी उपचारादरम्यान प्लाझ्मा घेतला आहे, त्यांनाही कोरोना प्रतिबंधक लस तीन महिन्यांनी घेता येणार आहे. (When to take Covid19 vaccine after recovery Wait for 3 months says Centre)

कोरोना प्रतिबंधक पहिला डोस घेतल्यानंतर कोविडची लागण झाली असेल तरीही दुसरा डोस घेण्यासाठी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. तज्ञ गटाने कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचा कालावधी ठेवण्याची शिफारस केली होती. ती स्वीकारण्यात आली असून अन्य काही शिफारशीही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या पुढीलप्रमाणे--

- ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांनी उपचारानंतर 3 महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी

-कोरोनावरील उपचारादरम्यान ज्यांना प्लाझ्मा देण्यात आलाय, अशांनी बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी लस घ्यावी

- ज्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर विषाणूची लागण झालीये, त्यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 महिन्यांनी दूसरा डोस घ्यावा

- मुलांना दूध पाजणाऱ्या महिला लस घेऊ शकतात, पण गरोदर महिलांनी लस घेऊ नये

सध्याच्या नियमानुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर चार आठवड्यांनी लस घेता येत होती. लशीचे ट्रायल दूध पाजणाऱ्या महिला आणि गरोदर महिलांवर करण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांना लस दिली जात नव्हती. तज्ञ गटाने दोन्हींना लस देण्याची शिफारस केली होती. पण, केंद्राने गरोदर महिलांना लस देण्याबाबत निर्णय राखून ठेवलाय. कोरोना परिस्थिती बदलत आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध संशोधन पार पडत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्राने महत्त्वाचे निर्णय घेतलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT