Law News 
देश

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Delhi High Court Law News: एका बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- एका बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. दोन प्रौढ व्यक्ती स्वत:च्या मर्जीने लैंगिक संबंध ठेवत असतील, तर त्यांना ते चुकीचं काम करत आहेत असं म्हणता येणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने एका व्यक्तीला बलात्काराच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

'लाईव्ह लॉ'ने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. न्यायमूर्ती अमित महाजन यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. लैंगिक संबंधांच्या प्रकरणात चुकीच्या आरोपांमुळे आरोपीची बदनामी होते असं देखील कोर्टाने म्हटलं आहे. आपला समाज ठरवतो की, लग्नाच्या मर्यादेमध्ये लैंगिक संबंध ठेवले जावेत. पण, दोन प्रौढ व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध ठेवले जात असतील तर त्यांना चुकीचं ठरवलं जाऊ शकत नाही. त्यांचा विवाह झाला असेल किंवा नाही यामुळे फरक पडत नाही, असं कोर्ट म्हणालं.

खोट्या आरोपामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब होऊ शकते, शिवाय खऱ्या घटनांची विश्वसनीयता कमी होते, असं देखील कोर्टाने म्हटलं. एका महिलेने आरोप केला होता की आरोपीने तिच्यावर बळजबरीने अनेकवेळा लैंगिक संबंध ठेवले आहेत. शिवाय लग्नाचे आश्वासन देखील दिले होते. पण, त्यानंतर तो लग्नाच्या आश्वासनापासून फिरला होता.

आरोपीचे लग्न झालेले असून त्याला दोन मुलं देखील आहेत. महिलेने आरोप केलाय की, व्यक्ती त्याच्याकडे भेटवस्तू मागायचा. महिलेने आतापर्यंत १.५ लाख रुपये आरोपीला दिल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने यावर म्हटलं की, जेव्हा कथित घटना घडली तेव्हा महिला सज्ञान होती. तसेच लग्नाच्या आश्वासनामुळे तिने आरोपीला लैंगिक संबंधांची परवानगी दिली होती. याबाबत कोर्ट अधिक तपास करणार आहे.

कोर्ट म्हणालं की, महिला तक्रार दाखल करण्याआधी आरोपी व्यक्तीशी भेट होते. शिवाय आरोपीचे लग्न झाल्याचे माहिती असताना देखील संबंध ठेवू इच्छित होती. कोर्टाने असं स्पष्ट केलंय की, व्यक्तीला जामीन देण्यात आलं आहे. पण, त्याने लग्नाचे खोटे आश्वासन दिले का? त्याचा हेतू चुकीचा होता का? यासंदर्भात पुराव्याच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT