देश

तो माझा अधिकार! लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना झापलं

सकाळ डिजिटल टीम

परवानगी देणारे तुम्ही कोण आहात असा प्रश्न करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना सुनावलं.

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session 2022) सुरुवातीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत बुधवारी चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, संसदेच्या कामकाजाच्या आचारसंहितेचं पालन योग्य रितीने करण्याबाबत सभापतींनी राहुल गांधींची शाळा घेतली. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणावेळी मधेच दुसऱ्या एका खासदाराला बोलण्यासाठी मी परवानगी देतो असं म्हटलं. त्यावरून लोकसभा (Loksabha) अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना फटकारलं.

अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी म्हटलं की, 'असं मधेच बोलण्याची परवानगी देणारे तुम्ही कोण? तुम्ही परवानगी देऊ शकत नाही, तो माझा अधिकार आहे. कोणालाही परवानगी देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. फक्त अध्यक्षांकडे हा अधिकार असतो.'

अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, टीकेवेळी खासदार कमलेश पासवान यांचा उल्लेख राहुल गांधींनी केला. तेव्हा राहुल गांधींच्या बोलण्याला उत्तर देण्याचा प्रयत्न कमलेश यांनी केला. मात्र सभापतींनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'मी एक लोकशाही मानणारा व्यक्ती आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला बोलण्यास परवानगी देतो.' राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर अध्यक्षांनी त्यांना संसदेच्या कामकाजाच्या नियमाची आठवण करून देत असा अधिकार फक्त अध्यक्षांना असल्याचं सांगितलं.

राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले होते की, तुम्ही कोणाचं ऐकत नाही. अगदी भाजपमध्ये असलेल्यांचेसुद्धा ऐकत नाही. आज दलित सहकारी पासवान यांना बोलताना ऐकलं. ते बोलताना दबकत होते, अडखळत होते. त्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे आणि मनातलं बोलले आहेत. मात्र ते चुकीच्या पक्षात आहेत असंही राहुल गांधी त्यांच्या भाषणात म्हणाले होते. यानंतर थोडावेळ सभागृहात गोंधळ झाला होता आणि राहुल गांधींनी पासवान यांना मधेच बोला माझी परवानगी आहे असं म्हटलं. त्यानतंर अध्यक्षांनी राहुल गांधींना झापलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT