PM Narendra Modi Team eSakal
देश

PM मोदींना कोण देऊ शकतं टक्कर? मतदारांनी घेतलं 'या' नेत्याचं नाव

जाणून घ्या मतादारांचा मूड काय?

सुधीर काकडे

देशात आज मतदान पार पडलं तर कोणाचं सरकार (Central Government) स्थापन होऊ शकतं... कोणाला किती मतं मिळू शकतात? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आणि देशाचा मूड जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे-सी व्होटरने प्रयत्न केला आहे. यामध्ये जनतेची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देखीलं मतदारांकडून मिळाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात एक प्रश्न कायम विचारला जातो, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM NarendraModi) पर्याय कोण? जनतेच्या मते सध्या विरोधकांमध्ये सर्वात मोठा चेहरा कोण आहे? या प्रश्नाची उत्तरं देखील यामधून समोर आली आहेत.

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कोण चांगली लढच देतंय? या प्रश्नाचं उत्तर देताना अनेकांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांचं नाव घेतलं आहे. ममता बॅनर्जी यांनी 17 टक्के लोकांनी पसंती दिली असून, त्यांच्या नंतर दुसऱ्या स्थानावर अरविंद केजरीवाल यांच्या नावाला १६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधींना केवळ ११ टक्के मतं मिळाली असून, ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये त्यांचा उत्तराधिकारी कोण असू शकतो, असा प्रश्न देखील या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. यावर जी उत्तरं आली ती खूपच रंजक आहेत. या मुद्यावर देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेकांनी पंतप्रधानपदासाठी मोदींनंतर देशाचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांना दिली आहे. अमित शहा यांना 24 टक्के लोकांनी पसंती दिली, तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 23 टक्के लोकांनी पसंती दिल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. गडकरींना 11 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

विचित्रच! जाहिरातीचं शूटींग अन् खांदा निखळला; स्टार खेळाडू IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, वाढली डोकेदुखी

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Numerology: मूलांक १ असलेल्या लोकांवर का असते श्री गणेशांची कृपा?गणपती बाप्पा अन् अंक १ चा काय आहे संबंध?

SCROLL FOR NEXT