varun singh ANI
देश

देश हादरविणाऱ्या घटनेत बचावले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग

सकाळ डिजिटल टीम

बिपीन रावत यांच्या पत्नीसह एकूण १३ जणांनी या दुर्घटनेत प्राण गमावले. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव या अपघातातून वाचले आहेत.

दिल्ली : तामिळनाडुत (Tamil Nadu) झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा मृत्यू झाला. बिपीन रावत यांच्या पत्नीसह एकूण १३ जणांनी या दुर्घटनेत प्राण गमावले. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव या अपघातातून वाचले आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी तमिळनाडूतील कुन्नूरजवळ लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधूलिका (Madhulika Rawat) यांच्यासह एकूण १४ जण होते. या १४ जणांपैकी रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेजमधील ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Varun Singh) सुखरुप वाचले आहेत. मात्र या दुर्घटनेत जखमी झालेले वरुण सिंग यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. वरुण सिंग हे मुळचे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) देवरिया जिल्ह्यातील रुद्रपुर तालुक्यातील कन्हौली गावचे रहिवासी आहेत. धाडस आणि पराक्रमांसाठी त्यांना ओळखलं जातं. गेल्या वर्षी तेजस विमानाच्या उड्डानादरम्यान अचानक फ्लाईंग कंट्रोल सिस्टीम फेल झाली होती. तेव्हा १० हजार फुटांवरुन त्यांनी यशस्वी लँड केलं होतं. यासाठी त्यांचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. यंदा १५ ऑगस्ट रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जनरल बिपीन रावत आज तमिळनाडूच्या निलगीरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज विलींग्टन इथं मार्गदर्शनासाठी गेले होते. मात्र, तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांचा अपघात झाला. रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधूलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली.

एका स्थानिकाने इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं की "मला पहिल्यांदा मोठा आवाज ऐकू आला. काय झालं ते बघायला मी पळत बाहेर आलो, तेव्हा दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर एका झाडावर आदळल्याचं दिसलं. तसंच मोठी आगही दिसली. आग लागलेलं हेलिकॉप्टर दुसऱ्या झाडावर आदळलं. मी दोन-तीन लोकांना हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना पाहिलं. यावेळी त्यांच्या शरीराला आग लागली होती. हेलिकॉप्टरही झाडाला आदळून पूर्णपणे जळून खाक झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT