देश

कोण आहेत MPचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव? किती झालंय शिक्षण? राजकीय कारकीर्द कशी? जाणून घ्या

असे अनेक प्रश्न सध्या तुम्हाला पडले असतील तर या वृत्तातून सविस्तर जाणून घ्या.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अनेक चर्चांनंतर मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्रीपदाची माळ डॉ. मोहन यादव यांच्या गळ्यात पडली आहे. पण मुख्यमंत्रीपद मिळालेली ही व्यक्ती नेमकी कोण आहे? त्याचं शिक्षण किती झालंय? तसेच त्यांचं राजकीय करिअर कसं आहे? असे अनेक प्रश्न सध्या तुम्हाला पडले असतील तर या वृत्तातून सविस्तर जाणून घ्या. (Who is Madhya Pradesh news CM Mohan Yadav How educated he is a political career need to know)

कोण आहेत मोहन यादव?

मोहन यादव यांचा जन्म २५ मार्च १९६५ मध्य प्रदेशातील उजैन इथं झाला आहे. त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण सायन्समधून झालं असून बीएससीची डिग्री त्यांनी मिळवली आहे. याशिवाय एलएलबी देखील त्यांनी केलं आहे. तसेच एमए, एमबीए आणि फिलॉसॉफीमध्ये पीएचडी केली आहे. उज्जैन इथल्या विक्रम युनिव्हर्सिटीतून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

कशी आहे राजकीय कारकिर्द?

  1. सन १९८२ मध्ये माधव विज्ञान महाविद्यालयात त्यांनी छात्रसंघाचे सहसचिव आणि त्यानंतर १९८४ मध्ये अध्यक्ष बनले.

  2. सन १९८४ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उज्जैनच्या नगरमंत्री आणि १९८६ मध्ये विभागप्रमुख होते.

  3. सन१९८८ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्य प्रदेशचे सहमंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते.

  4. सन १९८९-९० मध्ये एबीव्हीपीचे प्रदेश मंत्री बनले.

  5. सन १९९१-९२ मध्ये परिषदेचे राष्ट्रीय मंत्री

  6. सन १९९३-९५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उज्जैन नगरचे कार्यवाहक बनले.

  7. सन १९९७ मध्ये भाजयुमोच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य

  8. १९९८ मध्ये पश्चिम रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य

  9. सन २०००-२००३मध्ये भाजपच्या नगर जिल्हा महामंत्री

  10. २००४ मध्ये सिंहस्थ, मध्य प्रदेशच्या केंद्रीय समितीचे सदस्य

  11. २००४-१० मध्ये उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)

  12. सन २०१३ मध्ये आमदार म्हणून निवडून आले.

  13. सन २०१८ मध्ये दुसऱ्यांना आमदार बनले.

  14. आता सन २०२३ मध्ये तिसऱ्यांदा ते आमदार बनले आहेत.

  15. २ जुलै २०२० रोजी शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT