gangster 
देश

गँगस्टर 'हायकोर्ट महाराजा' कोण? ज्यासाठी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवलं जीवन!

IAS wife ended life for gangster: रंजीत कुमार यांच्या पत्नी सूर्या कुमार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. यात त्यांनी आत्महत्येमागेचं कारण सांगितलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गुजरातच्या अहमदाबादमध्ये आयएएस अधिकारी रंजीत कुमार यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. रंजीत कुमार यांच्या पत्नी सूर्या कुमार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. यात त्यांनी आत्महत्येमागेचं कारण सांगितलं आहे.

सूर्या यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नावे सुसाईड नोट लिहिली आहे. यात लिहिण्यात आलंय की, 'त्या नऊ महिन्यापासून गँगस्टर हायकोर्ट महाराजा याच्यासोबत संबंधात होत्या. पण, त्याने खोट्या प्रकरणात त्यांना अडकवलं.' सूर्या कुमार यांनी उल्लेख केलेला हायकोर्ट महाराजा नेमका कोण हे आपण जाणून घेऊया.

सूर्या कुमार या तामिळनाडूच्या आहेत. त्यांचे लग्न आयएएस रंजीत कुमार यांच्यासोबत झाले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत. पण, ९ महिन्यापूर्वी सूर्या यांनी घर सोडल होतं आणि त्या गँगस्टर हायकोर्ट महाराजासोबत राहण्यास गेल्या होत्या. हायकोर्ट महाराजा हा तामिळनाडूचा एक स्थानिक गँगस्टर आहे. सूर्या यांनी सांगितल्यानुसार, ९ महिन्यांपूर्वी त्यांचे आणि हायकोर्ट महाराजाचे संबंध प्रस्थापित झाले होते.

सूर्या कुमार यांच्या दाव्यानुसार, त्यांना हायकोर्ट महाराजाचे बॅकग्राऊंड माहिती नव्हते. दोघांनी सुरुवातीला एक व्यवसाय सोबत सुरु केला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये अफेअर सुरु झाले. त्यानंतर त्या आपल्या कुटुंबाला सोडून हायकोर्ट महाराजासोबत राहण्यास निघून गेल्या.

कर्जामध्ये बुडाल्या होत्या, अपहरणाचा कट रचला

सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलंय की, हायकोर्ट महाराजाने एका महिला फायनान्सरकडून ७५ लाख रुपये उधार घेतले होते. हायकोर्ट महाराजाचे कर्ज सूर्या कुमार फेडत होत्या. त्यांनी १.३५ कोटी रुपये देखील दिले होते. पण, एकीकडून पैसे घेणे आणि दुसऱ्याला देणे अशाप्रकारे त्यांचं सुरु होतं. पण, त्यामुळे त्या कर्जात बुडाल्या. अशावेळी हायकोर्ट महाराजाने फायनान्सरच्या मुलाचे अपहरण करण्याचा कट रचला.

कट फसला आणि पोलिसांनी सूर्या कुमार, हायकोर्ट महाराजा आणि सहकारी सेंथिल कुमार यांच्यावर अपहरणाचा आरोप केला. सूर्या यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, हायकोर्ट महाराजा हा कोण आहे हे मला माहिती नव्हतं. त्याने मला धोका दिला आहे. मला अटकेपासून वाचायचं होतं. तो हिस्ट्रीशीटर असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचं मला नंतर कळालं.

पतीच्या घरासमोर विष घेतलं

सूर्या या अडचणीत आल्यानंतर त्या पतीच्या घरी परत आल्या. यावेळी रंजीत कुमार घरी नव्हती. जेव्हा रंजीत कुमार यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकांना सांगितलं की, सूर्या यांना घरात घेऊ नका. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यानंतर सूर्या यांनी घराबाहेरच विष पिलं आणि स्वत:च रुग्णवाहिकेला फोन केला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सूर्या यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये असंही लिहिलंय की, माझे पती रंजीत हे खूप चांगले आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांनी मी नसताना मुलांची फार चांगली काळजी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

Taurus Horoscope 2026 : घर-जमीन खरेदीसाठी अनुकूल काळ, शनीच्या कृपेने वृषभ राशीला लाभाचा मार्ग, पण..; या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष?

SCROLL FOR NEXT