Lalit Modi
Lalit Modi sakal
देश

Lalit Modi : सुश्मिताला डेट करण्याआधी केलं होतं आईच्या मैत्रीणीशी लग्न; कोण होती मोदीची पहिली पत्नी?

निकिता जंगले

Lalit Modi: सध्या आयपीएलचे संस्थापक ललित मोदी चांगलेच चर्चेत आहे. राहुल गांधींनी 'मोदी आडनाव'वर केलेल्या विधानावर आता ललित मोदीही यूकेमधील कोर्टात जाणार आहे. ललित मोदी यांनी स्वत: ट्वीट करत याविषयी माहिती दिली होती.

ललित मोदी अनेकदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. ते सुश्मिता सेनला डेट करत असल्याचंही बोललं जातय पण तुम्हाला माहिती आहे का ललिल मोदींची पहिली बायको कोण आहे? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (who was Lalit Modi spouse wife minal modi )

कोण होती ललित मोदीची पत्नी?

ललित मोदी यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनल होतं. मीनलचं मोदीसोबत पहिले लग्न नव्हतं. याआधी तिने नायजेरीयाचे मुळ व्यापारी जॅक सागरानीसोबत पहिले लग्न केले होते. जॅक फसवणूकीच्या एका प्रकरणात सात वर्षे जेलमध्ये होते तेव्हा मीनलन त्याच्याशी नातं तोडलं.

पुढे 1991 मध्ये मीनलने ललित मोदीसोबत लग्न केले. मात्र 2018 मध्ये मीनलचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. एका हिंदी वृत्तानुसार मीनल ही ललित मोदीच्या आईची मैत्रीण होती. ती मोदीपेक्षा ९ वर्षांनी मोठी होती.

ललित मोदी हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत आलाय. आयपीएलमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्याने देश सोडला आणि ब्रिटेनमध्ये स्थायिक झालाय.

आता ललित मोदीनी राहूल गांधींवर टिका केली आहे आणि राहूल गांधींनी 'मोदी आडनाव'वर केलेल्या विधानावरुन ते यूकेमधील कोर्टात जाणार असल्याचे त्यांने ट्वीट केल्यानंतर पुन्हा एकदा ललित मोदी चर्चेत आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT