CDS esakal
देश

बिपीन रावत यांच्यानंतर कोण होणार नवे CDS? दोन मराठी नावे चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताचे सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) मृत्यू झाला आहे. रावत यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण? यावर आता चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान या पदासाठी २ मराठी अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत.

दोन मराठमोळ्या अधिकाऱ्यांची नावं चर्चेत

भारताच्या सीमेवर चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत, अशातच सीडीएस हे सर्वोच्च लष्करी पद असून ते फार काळ रिकामं ठेवता येणार नाही. या पार्श्वभूमीवर जनरल रावत यांच्या निधनानंतर आता नवे सीडीएस कोण? याची चर्चा सुरु झालीय. आणि त्यासाठी आता लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे (manoj naravane) आणि वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी (v chaudhari) या दोन मराठमोळ्या अधिकाऱ्यांचे नाव समोर येत आहे.

नव्या सीडीएसवर चर्चा

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर काल (ता.८) पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली लष्कराची उच्चस्तरीय बैठक जनरल रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सीसीएसची (CCS) बैठक झाली. ह्या बैठकीत रावत यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि बैठक संपली. पुन्हा ज्यावेळेस सीसीएसची बैठक होईल त्यावेळेस मात्र नव्या सीडीएसवर चर्चा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर

जनरल एमएम नरवणे हेच देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रोजेक्ट सुरु केलेत त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणेंनाच आहे. सध्याचे वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी हे सुद्धा मराठीच आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण नांदेडमध्ये झालेलं आहे. त्यांनी अलिकडेच इंडियन एअरफोर्सची जबाबदारी हाती घेतलीय. तर नेव्ही प्रमुख असलेल्या आर हरीकुमार यांनीही 30 नोव्हेंबरला सूत्रे हाती घेतलीयत. त्यामुळेच सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंची जी पात्रता, अनुभव आहे ती इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर आहे.

बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारानंतर घोषणा?

मूळ पुण्यातील भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या सैन्यातल्या सर्वोच्च पदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. यामुळे रिक्त झालेल्या सीडीएस पदावर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा सीडीएस दिवंगत बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारानंतर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT