Lok Sabha 2024
Lok Sabha 2024 esakal
देश

Lok Sabha 2024: लोकसभेसाठी भाजपचा फुलप्रूफ प्लॅन, 'हे' मित्रपक्ष मिळवून देतील 60 जागा; जाणून घ्या फॉर्मूला

रुपेश नामदास

BJP Election Strategy 2024: मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकट्याने 303 जागांचा आकडा पार केला होता. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी युती करून भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. पण 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांना आपल्या गोटात ओढायचं आहे.

तर दुसरीकडे अपना दल ते लोक जनशक्ती पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी ते टिपरा मोथा पर्यंत. या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र करायचे आहे. पण प्रश्न असा आहे की? 2024 च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षासोबत असणे भाजपसाठी किती फायद्याचं ठरणार आहे?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती विजयाचा मिळवला. 303 जागा जिंकून भाजपने एकट्याने सरकार स्थापन करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. पण गेल्या 4 वर्षात देशात विशेषता विरोधी राज्यात काय झालं याचा अंदाज भाजपला क्वचितच आला असेल.

एकीकडे गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा या विविध राज्यांमध्ये भाजप सरकार स्थापन करत असताना दुसरीकडे काही राज्यांमध्ये भाजपचे मित्र पक्ष पक्षाची साथ सोडून जात होते.

बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टी, जनता दल युनायटेड, गोव्यात विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पार्टी, तामिळनाडूमध्ये डीएमडीके, पश्चिम बंगालमध्ये गोरखालँडची मागणी करणारा गोरखा जनमुक्ती मोर्चा, राजस्थानमध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि पंजाबमध्ये शिरोमणी अकाली हे असे पक्ष आहेत ज्यांनी 2019 नंतर भाजपची साथ सोडली. या पक्षांची आपापल्या राज्याच्या राजकारणात मजबूत पकड होती.

हे पक्ष वेगळे झाल्याने भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले.

भाजपला गेल्या 4 वर्षात सर्वात जास्त नुकसान शिरोमणी अकाली दल, जनता दल युनायटेड आणि शिवसेना यांच्यामुळे झालं. आता प्रश्न पडतो की हे तीन पक्ष वेगळे झाल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा खरोखरच कमी होतील का?

शिरोमणी अकाली दल: 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत, एकेकाळी पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष केवळ 3 जागांवर विजयी झाला हे आपण पाहिले. त्यामुळं शिरोमणी अकाली दल या पक्षाने भाजपची साथ सोडल्याने भाजपचे फारसे नुकसान होणार नाही.

शिवसेना: शिवसेनेबद्दल बोलायचे झाले तर लोकसभेच्या 48 जागा खूप जास्त आहेत, महाराष्ट्रात भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना फोडून मुख्यमंत्री केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे नसले तरी शिवसेनेतील मोठा गट आज ही भाजपसोबतच आहे. आणि त्या गटाचे महत्त्व भाजपला माहित आहे.

जनता दल युनायटेड: बिहारमध्ये जेडीयूने भाजपची साथ सोडल्यामुळे भाजपला मोठं नुकसान होईल, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप + जेडीयू + एलजेपी यांनी एकत्रितपणे 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. मात्र २०२४ ला भाजपला ते साध्य करणे किंवा त्याच्या जवळपास जाणे फार कठीण जाईल.

या राज्यांतील 60 जागा भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतात

महाराष्ट्र- 25

बिहार- 10

यूपी- 10

झारखंड- 5

हरियाणा- 5

तमिलनाडु - 5

समजून घ्या या जागांचे गणित

महाराष्ट्र: या राज्यात भाजपने 23 जागा जिंकल्या आहेत. येथे एकूण 48 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 25 जागांवर विशेष लक्ष आहे. कारण उद्धव ठाकरेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहेत. अलीकडेच सीएसडीएसच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी होण्याची चर्चा आहे.

बिहार: येथे आरजेडी आणि जेडीयूसह 7 पक्षांची युती समोर आहे. 2014 मध्ये जेडीयूपासून वेगळं होत भाजपने 31 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 मध्ये भाजपला फक्त 17 जागा मिळाल्या. याठिकाणी भाजपने 25 प्लसचे लक्ष्य ठेवले आहे.

यूपी: या राज्यात 16 जागांवर भाजपचा पराभव झाला. यामध्ये पूर्वांचलमध्ये 10 जागा आहेत. या भागात राजभर मतदार अतिशय प्रभावी मानले जातात. त्यामुळे भाजप ओमप्रकाश राजभर यांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे.

हरियाणा: जाट आणि बिगर जाटांच्या राजकारणात भाजपसाठी हरियाणाची वाट अवघड आहे. यावेळी निवडणुकीपूर्वी पक्ष जननायक जनता पक्षासोबत युती करणार आहे.

पाटणा विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक वीर सिंग यांनी सांगितले की, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली असली तरी गेल्या 4 वर्षात अनेक राजकीय बदल झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये, अशी भाजपची इच्छा आहे, त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. आता 2024 पर्यंत भाजप कोणत्या कोणत्या पक्षाला एकत्र आणणार हे पाहावे लागेल.

abp न्यून ने दिलेल्या वृत्तानुसार...

हेही वाचा- अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

SCROLL FOR NEXT