देश

आपल्या देशाला भारत का म्हणतात ? असा आहे इंडियाच्या आधी नावाचा इतिहास

भारताच्या ‘भारत’, ‘हिंदुस्थान’ आणि ‘इंडिया’ या नावांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊयात.

Manoj Bhalerao

'India' Origin: शाच्या संविधानातून 'इंडीया'हा शब्द हटवून त्याऐवजी 'भारत'असं नावं लिहिलं जाणार अशी चर्चा होतं आहे. मात्र, या गोष्टीवरुन राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झालाय. भारतीय राज्यघटनेतील पहिल्याच अनुच्छेदात ‘इंडिया अर्थात् भारत हा राज्यांचा संघ असेल,’ असं नमूद केलं आहे. त्याप्रमाणे ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन नावांनी आपला देश ओळखला जातो. भारताच्या ‘भारत’, ‘हिंदुस्थान’ आणि ‘इंडिया’ या नावांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊयात.

भारताचाच्या नावाचा उल्लेख महाभारतातून आल्याचही बोललं जातं. दुष्यंत राजाचा पुत्र भरत यांच्या नावावरुन भरतकुल निर्माण झालं. त्यानंतर या भरतकुलात कौरव-पांडवांचा जन्म झाल्याचे काही अभ्यासक सांगतात. त्यामुळे भरत राज्याच्या नावावरुन भारत किंवा भारतवर्ष असं नाव पडल्याचं समजतं.

'भारत' या नावाचा उल्लेख जैन साहित्यात देखील सापडतो. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांच्या मोठ्या मुलाचं नाव भरत होतं. त्याला चक्रवर्ती भरत म्हणूनही ओळखल जायचं. भरत चक्रवर्तीन् राजाच्या नावावरुन भारत किंवा भारतवर्ष हे नाव प्रचलित झालं असं बोललं जातं. समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असणाऱ्या भूमीला भारतवर्ष म्हणून ओळखलं जायचं, असा उल्लेख विष्णुपुराणात आढळतो.

हिंदुस्थान हा शब्द मध्य आशियाई देशातून प्रचलित झाल्याचे समजते. एका इराणी राजाने जगातील विविध प्रदेशांच्या नावांची यादी बनवली होती. यात त्याने भारताच्या नावाची नोंद 'हिंदुस्तान'अशी केली. 'हिंद' हा शब्द सिंधु नदीच्या नावाचा अपभ्रंश होऊन तयार झालाय, असेही काही अभ्यासकांचे मत आहे. (Latest Marathi news)

इंडिया शब्द ग्रीक लोकांमुळे प्रचलित झाला. ग्रीक भाषेच्या आयोनियन बोलीभाषेत 'एच'या अक्षराचा उल्लेख होत नाही. त्याऐवजी 'आय'हे अक्षर वापरले जाते. त्यामुळे हिंदुश प्रांताला इंडिया किंवा इंडिका म्हणून ओळखलं गेलं. ग्रीक प्रवाशांच्या प्रवासामुळे ग्रीक आणि रोमन देशांनी देखील या भागाचा उल्लेख इंडिया म्हणून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election: महापालिका निवडणुकीत खेळीमेळी की खेळी? बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार; अहवाल मागवला, आता चौकशी होणार!

Arjun Tendulkar: अर्जुनचा पुन्हा फ्लॉप शो! गोवा संघाची हार, सूर्यवंशीच्या ८७ चेंडूंत नाबाद ११५ धावांनी गाजवला सामना

Pune News: कुंजीरवाडीच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंब थोडक्यात बचावले, प्रसंगावधान राखल अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्या जेरबंद

Pune News:...अखेर तीन बछडे आईच्या कुशीत सुखरूप; आंबेगाव तालुक्यातील शेतात आढळली बछडे, बिबट्या मादीचा जीव भेटीसाठी कासावीस!

SCROLL FOR NEXT