देश

Monday ला मराठीत 'सोमवार' का म्हणतात? स्विगीने सांगितले मजेशीर कारण

Monday ला मराठीत 'सोमवार' का म्हणतात? स्विगीने एका ट्वीटच्या माध्यमातून मजेशीर कारण सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Tweet of Swiggy on Monday: आपण कितीही चांगल्या ठिकाणी काम करत असलो, तरी आपल्याला सोमवार नकोसा वाटतो, कारण रविवारी आपण मस्तपैकी सुट्टीची मजा घेतलेली असते आणि सोमवारी आपल्याला ऑफिसला जावं लागणार असते. त्यामुळे सोमवारी कामावर जाताना कुठेतरी अस्वस्थ वाटते. अनेकजणांना तर सोमवार येऊच नये असं वाटतं.

हे सगळं ठिक आहे, परंतु इंग्रजीमध्ये मंडे म्हटलं जात असताना हिंदीत सोमवार का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? खरंतर तुम्ही या गोष्टीचा विचारच केला नसेल, पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले स्विगीचे हे ट्विट पाहून तुम्ही पोट धरून असाल. स्विगीने जे कारण दिले आहे, ते तंतोतंत खरे असल्याचे तुम्हाला वाटेल.

स्विगीनं ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "हिंदीमध्ये 'मंडे'ला सोमवार म्हणतात, कारण यादिवशी आपण एखाद्या युद्धावर (Some War) निघाल्यासारखं वाटतं." स्विगीच्या या ट्विटवर आतापर्यंत 300 हून अधिक लाईक्स आले आहेत आणि अनेक लोक ते रिट्विटही करत आहेत.

या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, संडेला हिंदीत रविवार म्हणतात कारण संस्कृतमध्ये रवि म्हणजे सूर्य. दरम्यान स्विगीने दिलेलं कारण निश्चितच तुम्हाला पोट धरून हसायला लावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT