केजरीवाल google
देश

Delhi High Court : ‘ईडी’समोर हजर का होत नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवाल यांना सवाल

सत्र न्यायालयाने हजर होण्याचे निर्देश दिले होते

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘ईडी’ने वारंवार समन्स देऊनही तुम्ही समोर हजर का होत नाही? असा सवाल आज उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारला. केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण न देता यासंदर्भातील दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या २२ एप्रिलला होणार आहे.

उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या समन्सला प्रतिसाद न दिल्यामुळे सत्र न्यायालयात विरोधात याचिका दाखल केली आहे. सत्र न्यायालयाने हजर होण्याचे निर्देश दिले होते. याला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आव्हान दिले आहे. केजरीवाल यांची बाजू मांडताना अभिषेक मनु सिंघवी ईडीचे समन्स बेकायदा असून समन्सला हजर राहण्याची गरज नसल्याचे सांगितले. यावर उच्च न्यायालयाने ईडीसमोर हजर का होत नाही? असा सवाल केला.

सिंघवी म्हणाले, ‘ मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना अशीच अटक केली आहे. ईडी समोर हजर झाल्यानंतर अटक होणार नाही, असे निर्देश उच्च न्यायालयाने द्यावे, असा युक्तिवाद केला. परंतु न्यायालयाने तसे निर्देश देण्यास नकार दिला. यापुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT