PM Narendra Modi 
देश

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Press Conference of Prime Minister Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाही ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाही ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. विरोधकांनी या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका देखील केली आहे. याच मुद्द्यावरुन मोदी यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. मी पत्रकारांशी बोलत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मी कोणाला बोलणं टाळलं नाही, असं मोदी म्हणाले.

आपल्या मीडियामध्ये असं कल्चर झालंय की, काहीही करु नका. फक्त माध्यमात चर्चेत रहा. मला त्या मार्गाकडे जायचं नाही. मला कष्ट करायचे आहेत. मला गरिबांच्या घरापर्यंत जायचं आहे. मी विज्ञान भवनच्या लालफीती कापून फोटो काढू शकतो. पण, मी एका छोट्या योजनेसाठी झारखंडच्या एका छोट्या जिल्ह्यात जाऊन काम करतो. मी एका नव्या वर्क कल्चरला आणू पाहात आहे. मिडियाला हे नवं वर्क कल्चर चांगलं वाटत असेल तर त्यांनी ते दाखवावं. त्यांना तसं वाटलं नाही तर त्यांनी दाखवू नये, असं मोदी म्हणाले.

मी संसदेला उत्तरदायी आहे. महत्त्वाचं म्हणजे मिडिया आता पहिल्यासारखा राहिला नाही. मी आधी 'आज तक'शी बोलायचो. पण, आता माध्यमांना माहिती असतं की मी कोणाशी बोलत आहे. पत्रकार कोणाच्या फेवरमध्ये आहे ते लोकांना माहिती असतं. त्यामुळे तो त्याच पद्धतीने बोलेल असं लोकांना वाटत असतं, असं ते म्हणाले.

मिडिया आज एक वेगळी एनटीटी राहिली नाही. अनेकांप्रमाणे लोकांना तुमचे विचार कळाले आहेत. अगोदर मिडिया बिनचेहऱ्याचा होता. त्याला कोणताच चेहरा नव्हता. मीडियामध्ये कोण लिहितं? लिहिणाऱ्याचे विचार कोणते? याबाबत कोणाला काही देणं-घेणं नव्हतं. पण, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही, असं मोदी म्हणाले.

आधी संवाद साधण्याचा एकच मार्ग होता. पण, आता अनेक मार्ग आहेत.आधी तुम्हाला मीडियाची गरज लागायची, पण आता जनता देखील मीडियाशिवाय आपला आवाज समोर आणू शकते. मिडिया शिवाय कोणीही व्यक्ती उत्तर देऊ शकतो, असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT