Railway Sakal
देश

Railway: रेल्वे स्टेशनचे नाव फक्त पिवळ्या बोर्डवरच का लिहिले जाते? यामागे काय कारण आहे, जाणून घ्या

यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?

राहुल शेळके

Why Railway Station Board Are Yellow: तुम्ही कधी विचार केला आहे का की देशभरात हजारो रेल्वे स्थानक आहेत, परंतु सर्व रेल्वे स्थानकांवर फक्त पिवळ्या फलकांवरच स्थानकांची नावे लिहिलेली का आहेत?

जर तुम्ही कधी विचार केला असेल तर तुम्ही नेहमी पिवळ्या साईन बोर्डवर रेल्वे स्थानकांची नावे काळ्या अक्षरात लिहिलेली पाहिली असतील. याशिवाय रेल्वे स्थानकावर असलेल्या इतर सूचनाही बहुतांशी पिवळ्या फलकावर लिहिलेल्या असतात. यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?

भारतात 7,000 हून अधिक मोठी आणि लहान रेल्वे स्थानके आहेत. सर्व स्थानकांवरच्या नावाच्या फलकाचा रंग सारखाच आहे आणि तोही पिवळा. काळा, निळा किंवा लाल नाही.

हा योगायोग नसून त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. एकसमानता दाखवण्यासाठी सर्वत्र एकच रंग ठेवण्यात आला आहे. वेगवेगळ्या रंगांमुळे रेल्वेच्या चालकाला ओळखण्यात अडचण येऊ शकते.

रेल्वे स्थानकांची नावे पिवळी का असतात?

पिवळा रंग निवडण्यामागील कारण म्हणजे हा रंग दुरून चमकतो आणि डोळ्यांना या रंगाचा त्रास होत नाही. यामुळे रेल्वेचा लोको पायलट दुरूनच पाहू शकतो. चमकदार पिवळा रंग दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी स्पष्टपणे दिसतो.

याद्वारे रेल्वेच्या लोको पायलटला योग्य प्लॅटफॉर्मवर थांबण्याच्या ठिकाणाची माहिती मिळते तसेच रेल्वे कुठे थांबवायची याची माहिती मिळते. याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास पिवळ्या रंगाची वेवलेंथ 570 ते 590 नॅनोमीटर असते. त्यामुळे हा रंग दुरूनच दिसतो.

पिवळ्या फलकावर काळ्या अक्षरात नाव का लिहिले आहे?

पिवळ्या बोर्डवर स्टेशनचे नाव लिहिण्यासाठी काळा रंग वापरला जातो कारण पिवळ्या बोर्डवर काळा रंग जास्त उठून दिसतो. आणि दूरवरूनही तो रंग स्पष्ट दिसतो. याशिवाय लाल रंग हा रेल्वेसाठी धोक्याचा रंग आहे. म्हणूनच हा रंग फक्त रेल्वे थांबवण्यासाठी वापरला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

PMC Scam : पुणे महापालिकेत २ कोटींचा गैरव्यवहार! कर्मचाऱ्यांचे गणवेश आणि 'इकोचिप' पावडर ९ वर्षांपासून गोदामात पडून

Pune Traffic : जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवस बंद; दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Latest Marathi News Live Update: पुणे जमीन व्यवहार प्रकरणात आंबेडकरवादी पक्ष-संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT