PM Narendra Modi Vladimir Putin Sakal
देश

PM Modi Birthday: ..अन् माहित असूनही पुतीन यांनी मोदींना शुभेच्छा देणं टाळलं!

दोन दिवसांपूर्वीच पुतीन मोदींना भेटले होते. मोदींचा वाढदिवस आहे, हे पुतीन यांना माहित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना देशभऱातून शुभेच्छा दिल्या जात आहे. देशातल्या विविध भागांमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, मोदी नुकतेच उझबेकिस्तानातून भारतात आले आहेत. तिथे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. मात्र यावेळी पुतीन यांना मोदींच्या वाढदिवसाबद्दल माहित असूनही त्यांनी मोदींना शुभेच्छा देणं टाळलं आहे.

उझबेकिस्तानमध्ये काल शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि रशियामधल्या द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा झाली. यावेळी "आमच्या परंपरेनुसार तुम्हाला आधी शुभेच्छा देऊ शकत नाही", असं म्हणत पुतीन यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. मात्र पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा पुतीन यांनी मोदींना दिल्या आहेत. अशी कोणती परंपरा आहे? जाणून घ्या...

यावेळी मोदींशी बोलताना पुतीन म्हणाले की माझे प्रिय मित्र मोदी, उद्या तुमचा वाढदिवस आहे. पण रशियातल्या आमच्या प्रथेनुसार आम्ही प्रत्यक्ष वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देत नाही. त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही. पण तुमच्या वाढदिवसाबद्दल आम्हाला माहित आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावं. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! त्यामुळे पुतीन यांनी मोदींना शुभेच्छा देताना रशियन प्रथेचं पालन केल्याचं दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT