cotton candy 
देश

Cotton Candy: 'बुढ्ढी के बाल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉटन कँडीवर बंदी का आणण्यात आलीये?

Why was cotton candy buddhi ke baal banned: 'बुढ्ढी के बाल' प्रत्येकाने कधीना कधी खाल्लं असेल. लहान मुलं तर आवडीने ते खातात.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कॉटन कँडी ज्याला आपण 'बुढ्ढी के बाल' म्हणतो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'बुढ्ढी के बाल' प्रत्येकाने कधीना कधी खाल्लं असेल. लहान मुलं तर आवडीने ते खातात. अनेक ठिकाणी ते सहज मिळून जातं. यात्रा, बाजार, रस्त्यावर अनेक विक्रेते ते विकत असतात. पण, बुढ्ढी के बाल खाणं धोकादायक असल्याचं समोर आलं आहे.

मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा आई-वडील आपल्या मुलांना बुढ्ढी के बाल घेऊन देतात. पण, आता पालकांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण, बुढ्ढी के बाल खाल्याने कँसर देखील होऊ शकतं. देशातील दोन राज्यांनी यावरुन धोक्याची घंटा वाजवली आहे. दिल्लीमध्ये याप्रकरणी संशोधन सुरु झालं आहे.(Why was cotton candy banned in tamilnadu why it is dangerous)

दोन राज्यात बंदी

तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये बुढ्ढी के बालवर बंदी आणण्यात आली आहे. याची विक्री आणि उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे. बुढ्ढी के बालमध्ये रंग येण्यासाठी केमिकल रोडामाईन-बी वापरले जाते. हे केमिकल धोकादायक आहे. त्यामुळेच याच्या खाण्यामुळे कँसरसारखे आजार होऊ शकतात.

बुढ्ढी के बाल

चेन्नईच्या एका बिचवर एकजण बुढ्ढी के बाल विकत होता. त्याचे सँपल घेऊन त्यावर अभ्यास करण्यात आला. या सँपलमध्ये रोडामाईन-बी हे केमिकल मिळाले आहे. तसेच निळ्या रंगाच्या बुढ्ढी के बालमध्ये रोडामाईन-बी सह अन्य एक केमिकल आढळून आला आहे. मानवी शरिरासाठी हे केमिकल धोकादायक असतात. त्यामुळे चेन्नई आणि पुदुच्चेरीमध्ये बुढ्ढी के बालवर बंदी आणण्यात आली आहे. त्यानंतर दिल्ली सरकार देखील सतर्क झाले असून यावर संशोधन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

विषारी सिंथेटिक

रोडामाईन-बी केमिकल एक सिंथेटिक असते. ज्याला विषारी आणि आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. या रोडामाईन-बी नावाच्या केमिकलचा उपयोग कपडे उद्योगामध्ये केला जातो. याच केमिकलचा वापर करुन कपडे आणि चामड्याला रंग दिला जातो. कागदाला रंग देणे, छपाई उद्योगात देखील रोडामाईनचा वापर केला जातो.

जे केमिकल कपडे आणि चापड्यांना रंग देण्यासाठी वापरले जाते, तेच बुढ्ढी के बालमध्ये टाकलं जात आहे. हेच बुढ्ढी के बाल मुलं आवडीने खातात आणि पालक आपल्या मुलांना घेऊन देतात. बुढ्ढी के बालमधील हे केमिकल एखाद्या विषासारखे असते. यामुळे तुमची मुलं प्रचंड आजारी होऊ शकतात. हे केमिकल शरिरामध्ये गेल्यानंतर नेमकं काय होतं हे देखील आपण जाणून घेऊया.

शरिरावर काय होतो परिणाम?

रोडामाईन-बी केमिकल किडनी, लीव्हर आणि आतड्यांमध्ये जमा होते. यामुळे कँसर आणि ट्यूमर होण्याचा धोका असतो. आतड्यामध्ये अल्सर होण्याचा धोका देखील वाढतो. याशिवाय डोक्यावर देखील याचा परिणाम होतो. त्वचा आणि डोळ्यात जळजळ होणे असा देखील त्रास जाणवतो.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे केमिकल तब्बल ६० दिवस शरिरात राहते आणि हळू-हळू त्याचे शरिरावर वाईट परिणाम होतात. याचा अर्थ एखाद्याने बुढ्ढी के बाल खाल्ल्यास केमिकल शरिरात ६० दिवस राहते. अन्य काही प्रकरणात यात पोट फुगणे, खाज येणे आणि श्वास घेण्यास अडचण येणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे यापुढे स्वत: खाताना किंवा मुलांना बुढ्ढी के बाल घेऊन देताना दहावेळा विचार करा. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT