arvind kejriwal 
देश

तुम्हाला मते का द्यावीत? - अरविंद केजरीवाल

पीटीआय

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत असून, त्या वेळी भाजपला का मते द्यावीत, याची कारणे दिल्लीतील नागरिकांना जाणून घ्यायची आहेत, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर चर्चेचे आमंत्रण दिले.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात शाहिनबागेत नागरिकांचे सुमारे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, एवढ्या दिवसांनंतरही केंद्रातील सत्ताधारी भाजपला या ठिकाणचा रस्ता रिकामा करता आलेला नाही याचे आपल्याचा आश्‍चर्य वाटते, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील सत्ता हस्तगत करण्यासाठी शाहीनबागेच्या मुद्द्यावरून भाजप घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. 

भाजपने दिल्लीसाठी काय केले?
मागील पाच वर्षांच्या काळात दिल्लीच्या विकासासाठी भाजपने काय केले आहे, हे दिल्लीकरांना जाणून घेण्याची इच्छा आहे, असा दावा करतानाच दिल्लीतील आप सरकारच्या मोफत योजनांना भाजप का विरोध करतो आहे, असा प्रश्नही केजरीवाल यांनी उपस्थित केला. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल हे मी ठरविणार असल्याचे सांगत अमित शहा हे मते मागत आहेत; परंतु तुमच्या हातात रिकामा धनादेश देण्यास दिल्लीचे नागरिक वेडे नाहीत, असा दावाही केजरीवाल यांनी केला.

लोकशाही बळकट करण्यासाठी दिल्लीतील नागरिकांसमोर कुठल्याही विषयावर मोकळ्या मनाने आणि प्रामाणिकपणे वादविवाद करण्याचे मी अमित शहा यांना आमंत्रण देतो. या चर्चेसाठीची वेळ आणि ठिकाण त्यांनी निश्‍चित करावे.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT