Crime News 
देश

Crime News: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानं पत्नीसह चार महिन्यांच्या मुलीची केली कुऱ्हाडीनं हत्या अन्...

कौटुंबिक कलहामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणानं पत्नी आणि आपल्या चार महिन्यांच्या मुलीची कुऱ्हाडीनं घाव घालत जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नी आणि मुलीचा जीव घेतल्यानंतर त्यानं स्वतः गळफास घेऊन स्वतःची जीवनं संपवलं आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रुदीखेडा गावात हा प्रकार घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रुदीखेडाचे रहिवासी असलेले सेवानिवृत्त कानूनगो श्यामलाल यांचा मुलगा मोहन कुमार (वय ३५) त्याची पत्नी सीमा (वय ३०) आणि दोघांची चार महिन्यांच्या मुलीसह वेगळा राहत होता.

रविवारी त्याचा पत्नीसोबत कलह झाला त्यानंतर त्यांनं एका बंद खोलीत पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालत तिची हत्या केली. त्यानंतर त्याला आपल्या पोटच्या मुलीचीही दया आली नाही, तिलाही त्यानं ठार मारलं. त्यानंतर त्यानं त्याच खोलीत साडीनं गळफास घेत आत्महत्या केली.

हे ही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

शेजाऱ्यांनी दिली कुटुंबियांना माहिती

मृत कुटुंबाच्या घराजवळच जगन्नाथेश्वर मंदिरात भागवत कथेचा सप्ताह सुरु होता. त्यामुळं सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमात होते. कथेनंतर शेजारचे लोक आपापल्या घरी परतले, त्यानंतर काही महिलांना मोहनच्या घरात आरडाओरडा करत असल्याचा आवाज ऐकला पण काही वेळातच त्याच्या घरात पूर्णपणे शांतता जाणवली.

त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या मोहनच्या छोट्या भावानं त्याच्या वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय घरी पोहोचल्यानंतर आतला दरवाजा बंद असल्यानं त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावरील खिडखी तोडून घरात प्रवेश केला. तर मोहनची पत्नी आणि बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यानं गळफास घेतल्याचं पाहून सर्वांना धक्काच बसला.

दोन वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

भाऊ सोहनच्या माहितीनुसार, मोहन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याबरोबरच नोकरीसाठी देखील प्रयत्न करत होता. पण त्याला नोकरी मिळत नव्हती, त्यामुळं तो मानसिकदृष्ट्या अस्थिर बनला होता. त्याच्यावर लखनऊ येथील रुग्णालयात उपचारही सुरु होते. दोनच वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT