Ladki Bahin Yojana esakal
देश

Ladki Bahin Yojana: पतीला सोडून पळून गेली पत्नी...'लाडकी बहीन योजने'च्या पैशांमुळे पकडली, नेमकं काय घडलं?

MP Crime News in Marathi: पोस्टमार्टमनंतर आई-वडील आणि पोलिसांच्या दबावामुळे पती सुनील शर्मा यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही तर अस्थिकलश विसर्जन देखील केले.

Sandip Kapde

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील मेहगावमध्ये राहणाऱ्या सुनील शर्मा यांची पत्नी ज्योती शर्मा 2 मे रोजी अचानक गायब झाली. सुनीलने प्रथम स्वतः शोध घेतला, पण काहीच हाती लागले नाही. अखेर मेहगाव पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दाखल केली. त्यानंतर  4 मे रोजी कतरौल गावाजवळच्या शेतात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. सुनील यांना मृतदेह ज्योतीचा नसल्याचे वाटत होते, मात्र ज्योतीच्या माहेरच्या लोकांनी तो ज्योतीचाच असल्याचे ओळखले.

(Wife fled from mp Bhind was caught in Noida while trying withdraw money from Ladli Behna Yojana)

अंतिम संस्कार आणि नंतरची घटना-

पोस्टमार्टमनंतर आई-वडील आणि पोलिसांच्या दबावामुळे पती सुनील शर्मा यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही तर अस्थिकलश विसर्जन देखील केले. पत्नीच्या घरच्यांनी केलेल्या आरोपामुळे कारवाई करत पोलिसांनी सुनीलला पकडून बेदम मारहाण देखील केली, मात्र हा मृतदेह ज्योतीचाच आहे हे सत्य मानायला सुनील तयार नव्हता. सुनीलने सांगितले की, त्याने पत्नीची हत्या केली नाही आणि मृतदेह पत्नीचा नव्हता. दिवस सरत गेले आणि सुनील आणि त्याच्या कुटुंबावर पोलिसांचा दबाव वाढत गेला.

सुनील पोलिसांना टाळून दिवस काढत होता, अचानक एके दिवशी सुनील पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला, तेव्हा त्याला समजले की ज्योतीच्या बँक खात्यातून 2700 चे व्यवहार झाले आहेत. ज्योती 'लाडली बहना योजना'च्या पैसे काढताना नोएडामध्ये सापडली. नोएडा पोलिसांनी तिला पकडून मेहगावला नेले. आता पोलिसांसमोर प्रश्न आहे की जळालेला मृतदेह कोणाचा होता?

मध्य प्रदेशात महिलांना आर्थिक मदत देणारी 'लाडली बहना योजना' आहे. दरमहा 1250 रुपये देण्याची तरतूद आहे. ज्योतीने अंगठ्याचा ठसा देऊन रक्कम काढली. यानंतर ही बातमी पोलिसांपर्यंतही पोहोचली. सुनील पोलिसांसह नोएडाला पोहोचला, तेव्हा अचानक फूटपाथवर ज्योती तिची तुटलेली चप्पल दुरुस्त करताना दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT