Wife insulting husband calling him impotent cruelty, Delhi High Court Esakal
देश

Divorce Case: पत्नीने पतीला अपमानित करणे, नपुंसक म्हणणे क्रूरता: हायकोर्ट

Mental Cruelty: या जोडप्याचे 2011 मध्ये लग्न झाले होते. दोनदा IFV प्रक्रिया करूनही, जोडप्याला मूल होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वैवाहिक मतभेद निर्माण झाले.

सकाळ डिजिटल टीम

कुटुंबातील सदस्यांसमोर पत्नीने पतीला अपमान होईल असे बोलणे पती नपुंसक आहे असे म्हणणे, हे मानसिक क्रूरता आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने पत्नीने पतीवर क्रूरता केली असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पतीला घटस्फोट मंजूर करताना हे निरीक्षण केले.

“या प्रकरणातील दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आले की, जी पत्नी त्याच्या पतीला उघडपणे अपमानित करते, त्याला नपुंसक म्हणून संबोधते आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्या लैंगिक आयुष्यावर बोलते तिने पतीवर मानसिक क्रूरताच केली असे म्हटले जाऊ शकते," असे न्यायालयाने म्हटले.

दरम्यान, पत्नीचा स्वभाव चिडचिडा आणि बोलणे वाईट आहे. ती सतत क्षुल्लक गोष्टीवरून भांडत असते. असे कारण देत पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. जो फेटाळण्यात आला.

यानंतर पतीने याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला.

या जोडप्याचे 2011 मध्ये लग्न झाले होते. दोनदा IFV प्रक्रिया करूनही, जोडप्याला मूल होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वैवाहिक मतभेद निर्माण झाले. मूल होत नसल्याने पत्नी पतीला कुटुंबातील सदस्यांसमोर नपुंसक म्हणायची. असा आरोप पतीने केला आहे.

घटस्फोटाला परवानगी देताना न्यायालयाने सांगितले की, वंध्यत्वाची वैद्यकीय स्थिती असताना पत्नीने पतीला नपुंसक ठरवल्याने, पतीला झालेला सार्वजनिक अपमान दुर्लक्षित करता येणार नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या या खंडपीठाने असेही निरीक्षण नोंदवले की, "पत्नीचे सादर केलेल्या एकाही पुराव्यात हे दिसले नाही की, पतीने कधीही तिची अवहेलना केली आहे किंवा तो त्याच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला आहे."

“दोन्ही बाजूंचे पुरावे तपासल्यानंतर आम्हाला वाटते की, कौटुंबिक न्यायालयाचा पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय अस्पष्ट होता. त्यामुळे तो बाजूला ठेवत आम्ही पतीला घटस्फोट मंजूर करत आहोत," असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Electricity Issue : हिंजवडीवर वीजसंकट; केबल दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी

'मी देहदान केलं आहे!' 'ठरलं तर मग'च्या सायलीने सांगितली आतली गोष्ट, म्हणाली, 'जेवढं आपण दान करू शकतो ते....'

Latest Maharashtra News Updates : : शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तीन कोटी

Latur Education: अकरावीसाठी पहिल्या फेरीत ३२ हजार ७७० विद्यार्थ्यांचा प्रवेश; आता दुसऱ्या फेरीकडे पालकांचे लक्ष

"त्यानंतर मला ताप अन् वाचा गेली" ठरलं तर मग फेम अभिनेत्याने सांगितला तो भयंकर प्रसंग ; "थिएटरने.."

SCROLL FOR NEXT