Matrimonial House Esakal
देश

Divorce: "परस्पर प्रेम, सहकार्य आणि निष्ठेवरच विवाह बहरतो," पतीला घटस्फोट मंजूर करताना हायकोर्टाने का केली ही टिप्पणी?

Husband Wife Relation: पत्नीने सतत घर सोडण्याचे आरोप नाकारले नाहीत, परंतु तिचा पती तिच्याबद्दल उदासीन आहे आणि कुटुंबातील सदस्यांनी अपमान केल्याचा आरोप तिने केला.

आशुतोष मसगौंडे

Matrimonial Home:

दिल्ली उच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी, पतीच्या कोणत्याही चुकीशिवाय पत्नीने पती आणि सासरचे घर सोडणे मानसिक क्रूरतेचे कृत्य आहे, असे म्हटले आहे.

न्यायाधीश सुरेश कुमार कैत आणि न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने एका व्यक्तीलला मानसिक क्रूरता आणि पत्नी वेगळे राहत असल्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर करताना ही टिप्पणी केली.

यावेळी न्यायालय म्हणाले, "हे प्रकरण स्पष्ट आहे. यामध्ये पत्नी वेळोवेळी कोणत्याही कारणाशिवाय सासरचे घर सोडायची. पतीपासून वेगळी राहायची. तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती पुन्हा घरी यायची. त्यामुळे पतीसाठी ही एक मानसिक क्रूरता आहे. त्याला कोणत्याही चुकीशिवाय हा सर्व मनस्ताप सहन करावा लागला."

न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, परस्पर प्रेम, सहकार्य आणि निष्ठेवरच विवाह बहरतो.

या जोडप्याने 1992 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर पतीने 2017 मध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली.

कौटुंबिक न्यायालयाने 2022 मध्ये पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली, त्यानंतर त्याला उच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागले.

उच्च न्यायालयासमोर, त्याने आरोप केला की, त्याच्या पत्नीचे वर्तन अनियमित होते, तिने त्याच्यावर विविध प्रकारचे क्रौर्य केले. तिने किमान सहा वेळा घर सोडले आणि पुन्हा त्याच्याकडे परतली. तसेच पत्नीने 2011 मध्ये, तिचा पती मेला आहे असे म्हटल्याचा आरोपही करण्यात आला.

पत्नीने सतत घर सोडण्याचे आरोप नाकारले नाहीत, परंतु तिचा पती तिच्याबद्दल उदासीन आहे आणि कुटुंबातील सदस्यांनी अपमान केल्याचा आरोप तिने केला. तिने असाही दावा केला आहे की, तिच्या पतीनेच तिला अनेकवेळा माहेरी नेऊन सोडले होते.

न्यायालयाला असे आढळले की, पत्नी तिच्या सासूच्या वागण्यावर असमाधानी असल्याचे दाखवणारे अनेक पुरावे आहेत. परिणामी ती सासरी नाखूष होती. पण, पत्नीने घर सोडल्याच्या विविध घटनांचा आढावा घेताना पतीने कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

पतीच्या अपिलाला परवानगी देताना न्यायालयाने म्हटले आहे की, "हे सिद्ध झाले आहे की पत्नी पतीला कोणत्याही वाजवी कारणाशिवाय सोडून जायची आणि परित्यागाच्या आधारावर पती घटस्फोट घेण्यास पात्र आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT